HW News Marathi
मुंबई

सीएसएमटी रेल्वे स्थानकावर लोकल बफरला धडकून अपघात

मुंबई | छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकात आज (२६ एप्रिल) लोकलला अपघात झाल्याची घटना घडली आली आहे. हार्बर रेल्वे मार्गावरील एक लोकल ट्रेन बफरला धडकली आहे. हा अपघात फलाट क्रमांक एकवर दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास हा झाल्याची माहिती मिळत आहे. लोकल ट्रेन बफरला धडकल्याने जोरदार आवाज झाला. लोकलचा वेग कमी असल्याने मोठा अनर्थ टळला. परंतु फलाट क्रमांक एकवरील वाहतून काही काळसाठी खोळंबली आहे.

मोटरमनने तातडीने ब्रेक दाबल्याने बसलेल्या झटक्यामुळे लोकलच्या डब्यांना हादरा बसला. परंतु सर्व प्रवासी हे सुखरूप आहेत. हार्बर मार्गावरील लोकल वाहतूक ही या घटनेनंतर काही काळ विस्कळीत झाली होती. मात्र लोकल तातडीने मागे घेत मार्ग मोकळा करण्यात आला. त्यानंतर काही काळ बंद पडलेली हार्बर मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कुर्ला स्थानकातून कल्याणच्या दिशेने जाणारी पहिली लोकल रवाना

News Desk

समलैंगिकता गुन्हा नाही, न्यायालयाच्या निर्णयाचे जल्लोषात स्वागत

News Desk

कॉग्रेसच्या आंदोलनामुळे मंत्रालयासमोर कडक पोलिस बंदोबस्त

News Desk