HW News Marathi
मुंबई

राजभवनात सापडल्या दोन ब्रिटिशकालीन तोफा

मुंबई | महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या निवासस्थान असलेल्या राजभवनामध्ये प्रत्येकी २२ टन वजनाच्या दोन ब्रिटिशकालीन तोफा सापडल्या आहेत. या दोन ब्रिटिशकालीन तोफा शनिवारी (३ नोव्हेंबर)ला राजभवनातील जमिनीखाली सापडल्या आहेत. या महाकाय तोफा क्रेनच्या मदतीने बाहेर काढण्यात आल्या असून यांचे वजन २२ टन आहे.

राज्यपाल विद्यासागर राव यांनी या तोफा जमिनीतून बाहेर काढण्याच्या कामाची पाहणी केली. तसेच या तोफांबाबत अधिक माहिती घेण्याची सूचना अधिकाऱ्यांना दिल्हेी. सध्या या तोफा राजभवनातील आवारात ठेवण्यात आल्या आहेत. याआधी राजभवनामध्ये २०१६ रोजी एक ब्रिटिशकालीन बंकर आढळला होता.

या दोन्ही तोफाचे प्रत्येकी वजन २२ टन असून लांबी ४.७ मीटर अधिकतम व्यास १.५ मीटर इतका आहे. दोन्ही तोफा क्रेनच्या मदतीने ५० मीटर उंचवर उचलण्यात आल्या होत्या. यानंतर राजभवनाच्या हिरवळीवर ठेवण्यात आल्या. या तोफा अनेक दशके दुर्लक्षित अवस्थेत मातीखाली दबून होत्या.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

३७ वर्षीय अमेरिकन नागरिक असलेल्या महिलेने  २७ व्या माळ्यावरून उडी घेऊन केली आत्महत्या 

News Desk

Breaking News | सायन रुग्णालयात एका गोविंदाचा मृत्यू

News Desk

नाणार प्रकल्पाला विरोध हा कायमच, हा प्रकल्प होणे अशक्य | सुभाष देसाई

News Desk
मनोरंजन

शाहरुखला भेटता आले नाही म्हणून फॅनने स्वतःवर केले ब्लेडने वार

News Desk

मुंबई | बॉलिवूडचा ‘किंग’ शाहरुख खानच्या ‘मन्नत’ घरासमोर काल (३ नोव्हेंबर) रात्री एका फॅनने स्वतःवर ब्लेडने वार करून घेतल्याची घटना घडली आहे. मोहम्मद सलीम असे या व्यक्तीचे नाव असून तो कोलकात्याच्या राहणार असल्याची माहिती मिळाली आहे. शनिवारी रात्री शाहरुखच्या घरी प्री-दिवाळी पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.

या पार्टीसाठी ‘मन्नत’वर सेलिब्रेटींची मांदियाळी होती. त्यावेळी सलीमने स्वतःवर ब्लेडने वार करून घेतले. यात तो गंभीर जखमी झाला. यामुळे पोलिसांनी तात्काळ त्याला ताब्यात घेऊन रुग्णालयात दाखल करण्यात आले. सलीमला उपचारानंतर सोडूनही देण्यात आले. शाहरूखचा ‘झिरो’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होताय. २ नोव्हेंबरला शाहरूखने या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च केला. या चित्रपटात शाहरुखशिवाय कॅटरिना कैफ, अनुष्का शर्मा मुख्य भूमिकेत आहेत.

शाहरुखने आपला वाढदिवस आणि प्री-दिवाळी पार्टीचे सोबतच साजर केले. या पार्टीसाठी आमिर खान, अर्जुन कपूर, इशान खट्टर, करीना कपूर खान, करिश्मा कपूर, कटरीना कैफ, संजय लीला भंसाली, काजोल, मान्यता दत्त, अर्पिता खान शर्मा, अलवीरा अग्निहोत्री, जया बच्चन, स्वेता बच्चन, शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा, मलाइका अरोरा, तापसी पन्नू, इम्तियाज अली, शायना एनसी आणि अनेक दिग्गज उपस्थित होते.

 

Related posts

रिंकू राजगुरू ‘कांगर’मधून येणार प्रेक्षकांच्या भेटीला 

swarit

लोकशाहीर गफूरभाई पुणेकर पंचतत्वात विलीन

News Desk

सुप्रीम कोर्टाचा आदेश सर्व राज्यात ‘पद्मावत’ रिलीज

swarit