HW News Marathi
मुंबई

मरिन ड्राईव्हवर दोन तरुण बुडाले

मुंबई | मुंबईतील मरिन ड्राईव्हमध्ये दोन युवक बुडाल्याची घटना आज (६ जुलै) दुपारी दोनच्या सुमारास घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस, कोस्ट गार्ड आणि अग्नशिमन दलाच्या जवानांनी या तरुणांचा शोध घेण्यास सुरुवात केली. तातडीने शोधकार्य सुरु करण्यास सुरुवात केली असून कोस्टगार्डच्या हेलिकॉप्टरने त्यांचा शोध सुरु केला. मात्र त्यांना कुठेही हे दोन्ही तरुण आढळले नाहीत.

दुपारच्या सुमारास एक तरुण आणि एक मुलगा बुडाला. त्यापैकी एकाचे नाव जावेद शेख असून तो ड्रायव्हर आहे. जावेद हा जवळच्याच महात्मा फुले एसआरए सोसायटीत राहतो. या समुद्रात मुलगा बुडत होता. त्यावेळी पोहता येत असलेल्या जावेदने त्याला वाचवण्यासाठी समुद्रात उडी मारली. त्याला वाचवण्यात जावेदला यश आले. मात्र एक मोठी लाट आली आणि दोघांनाही आत घेऊन गेली. या लाटेमुळे दोघेही वेगवेगळे झाले. हे दोघे बुडताना पाहून पोलिसांनी जावेदच्या दिशेने दोरी टाकली, ती दोरी जावेदने पकडली, मात्र पुन्हा लाट आली आणि दोरी सुटली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांना धमक्यांचे फोन

News Desk

…तर मनसेच्या मीनाक्षी डोईफोडे गुडघ्यावर चालणार   

News Desk

मुलुंड डम्पिंग ग्राउंड उद्यापासून बंद, कचऱ्याचा भार कांजूर आणि देवनारवर 

swarit