HW News Marathi
मुंबई

उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी जाणार ‘वर्षा’ बंगल्यावर

मुंबई – शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे सिंधुदुर्गातील नाणार प्रकल्पग्रस्तांसोबत वर्षा बंगल्यावर गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे. नाणार ऑईल रिफायनरीवरून कोकणात चांगलेच राजकारण तापले आहे. नारायण राणे विरोद्ध सेना असा सामना रंगताना दिसत आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्ताने सेनेने विधानसभा आणि लोकसभा निवडणुका स्वबळावर लढण्याचा इशारा दिला आहे. या बैठकीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आले आहे. शिवसेनेने युती तोडू नये, यासाठी भाजपकडून शिवसेनेची मनधरणी करत असल्याचे वृत्त राजकीय वर्तुळातून पुढे येत आहे. उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री यांच्या गुरुवारी होणाऱ्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोस्टल रोड प्रकल्पाला मुंबई उच्च न्यायालयाकडून लाल झेंडा

News Desk

पुण्यात पुन्हा दुचाकी जळीतकांड

News Desk

आता नवरात्रोत्सवाला ऑनलाईन परवानगी

swarit