HW News Marathi
मुंबई

शेंडकरांची प्लास्टिक मुक्तीसाठी अनोखी संकल्पना

मुंबई | राज्यात सरकारने प्लास्टिक बंदी लागू केली आहे परंतु याची अंमल बजावणी मात्र तुरळक प्रमाणात होताना पहायला मिळत आहे. राज्यसरकारच्या प्लास्टिक मुक्त मोहीमेला पाठींबा दर्शवताना मुंबईतील उद्योजकनानासाहेब शेंडकर यांनी आपल्या मुलाच्या लग्ना निमित्त कापडी पिशव्या देऊन राज्यसरकारच्या प्लास्टिक मुक्त मोहीमेला पाठींबा दर्शवला आहे.

निसर्गासाठी अत्यंत घातक असलेल्या प्लास्टिक बंदीची कल्पना राज्यसरकारला सुचली आणि उशीरा का होईना पण महाराष्ट्रात प्लास्टिक बंदीला प्रारंभ झाला आहे. या प्लास्टिक बंदीचे अनेक सामाजिक संस्थांनी स्वागत केले आहे. अशीच एक संस्था चालवत असलेले व्यवसायिक नाना शेंडकर नेहमीच पर्यावरण पुरक गणेशोत्सवासाठी इको फ्रेंडली पुठ्यांची मखरे इको फ्रेंडली कागदी गणेश मुर्ती भाविकांना उपलब्ध करुन देतात. शेंडकरांनी मुलाच्या लग्नात इकोफ्रेंडली पत्रिका बनवली असून निमंत्रण देताना प्रत्येकाला ते एक कापडी पिशवी देत आहेत. त्यामुळे सर्वांना प्लास्टिक बंदीचे महत्व कळेल आणि लोक कापडी पिशव्यांचा वापर करतील अशी शेंडकरांची अपेक्षा आहे.

लग्न समारंभात अनेक लोक एकत्र येतात म्हणून एक वेगळा संदेश देण्यासाठी ही संकल्पना शेंडकर कुटूंबियांनी राबवली आहे. लग्नात सर्वांना देण्यासाठी जवळपास दोन ते अडीच हजार कापडी पिशव्या वाटण्यात येणार आहेत. काही पिशव्या लग्नाचे निमंत्रण देताना तर लग्नात येणा-या वऱ्हाडी मंडळींना देण्यात येणार आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

तरुणीचा विनयभंग करून केली धक्काबुक्की -रिक्षाचालक ताब्यात

News Desk

सोनिया गांधींच्या विरोधात केलेल्या विधनाबाबत मुंबईत उद्या अर्नब गोस्वामींची पुन्हा चौकशी होणार

News Desk

28 हजार महापालिका कर्मचारी करत आहेत मुंबईची स्वच्छता

News Desk