HW News Marathi
मुंबई

एसटी बस मुंबईच्या पावसात अडकली

मुंबई | मुंबई, नवी मुंबई, कोकण किनारपट्टी आणि यासह संपूर्ण महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. देशातील बहुतांश भागात अशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. मान्सून शहरात आणि राज्यात स्थिरावत असताना, दरवर्षीप्रमाणे यंदाही सखल भागांत पाणी साचल्याच्या घटना घडल्याचे पाहायला मिळत आहे.

मुंबईतील किंग्ज सर्कल परिसरात दरवर्षी प्रमाणे पाणी साचलेले दिसत आहे. या साचलेल्या पाण्यामध्ये लाल परी, अर्थात एसटी महामंडळाच्या बस अडकल्याचं दिसत आहे. तर, दुसरीकडे याच साचलेल्या पाण्यातून बेस्ट आणि इतर लहान वाहने वाट काढताना दिसत आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ठाण्यातील खान कंपाऊंडमधील प्लास्टिक गोदामाला आग

News Desk

शिवस्मारकाच्या पायाभरणीसाठी गेलेल्या स्पीड बोटच्या अपघात १ जण बुडाल्याची भीती

News Desk

मुळा नदीचे पाणी झोपडपट्टीत शिरले; नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले

News Desk