HW News Marathi
मुंबई

रिलायन्स कंपनीची निवड कुणी केली, हे ड सॉल्ट एव्हीएशनलाच माहिती !

मुंबई| राफेल डीलप्रकरणी गैरव्याहारांचे आरोप संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी फेटाळले आहे. सीतारामन असे देखील म्हटल्या की, “रिलायन्स कंपनीची निवड कुणी आणि का केली हे डसॉल्ट एव्हीएशनलाच,” माहिती असेल असे सांगून हात झटकले आहेत. सीतारामन या आज (२५ ऑक्टोबर) ला मुंबईतील इंडिया समिटमध्ये त्यांनी आपले मत मांडले.

राफेल डीलवरून सतत काँग्रेसकडून होत असलेल्या टीकेला हे उत्तर दिले आहे. यावेळी त्या असे देखील म्हटणाल्या की, राफेल डील करारातील हा निकष २०१२ मधील मूळ निविदेमध्ये सुद्धा होता. त्यावेळी केंद्रात काँग्रेसचे सरकार हे स्पष्ट केले होते. राफेल डील पुर्णपणे काँग्रेस सरकारच्या काळात ठरविलेल्या करारानुसारच झाली होती.

काँग्रेसने त्यावेळी सरकारने १८ विमाने थेट खरेदी करण्याचे ठरवले होते. मोदी सरकार या डीलमध्ये विमानांच्या संख्ये वाढ करून ३६ केली आहे. सध्या दोन तुकड्यांची तात्काळ निकड असल्याने ३६ विमाने खरेदी केली जात आहेत, असेही सीतारामन यांनी म्हटले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

Raj Thackeray ED : मरिन ड्राईव्ह, दादर, आझाद मैदानासह ईडी कार्यालयाबाहेर जमाव बंदी

News Desk

मुंबईत जोरदार पाऊस, रेल्वेची वाहतूक विस्कळीत

News Desk

बेस्ट, रेल्वे, मोनो आणि मेट्रो वाहतुकीसाठी एकच तिकीट

News Desk
देश / विदेश

नीरव मोदीची परदेशातील संपत्ती जप्त

Gauri Tilekar

नवी दिल्ली । पंजाब नॅशनल बँकेला सुमारे १३ हजार कोटी रुपयांचा घोटाळा करून फरार झालेला हिरे व्यापारी नीरव मोदी याची हाँगकाँगमधील २५० कोटींची मालमत्ता अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) जप्त केली आहे. ही मालमत्ता मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यातील कलम ५ अंतर्गत जप्त करण्यात आली आहे.

नीरव मोदीची परदेशात ४ हजार कोटींची मालमत्ता असल्याची माहिती ‘ईडी’ला मिळाली होती. त्यानंतर ही मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. नीरव मोदी आणि त्याचा काका मेहुल चोक्सी हे पीएनबी घोटाळ्यातील प्रमुख आरोपी आहेत. या दोघांनी मिळून पंजाब नॅशलन बँकेच्या मुंबईतील शाखेत काही कर्मचाऱ्यांच्या साथीने १३ हजार कोटींचा घोटाळा केला आणि ते देश सोडून फरार झाले आहेत.

या आधी ईडीने मोदींच्या ४ देशांतील ६३७ कोटींची संपत्ती जप्त केली होती. मनी लाँडरिंग प्रतिबंध कायद्यांतर्गत अमेरिकेतील न्यूयॉर्कमधील मोदींचे २१६ कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली गेली.

Related posts

पहिल्या टप्याच्या मतमोजणीत काँग्रेसची आघाडी

News Desk

प्रेयसीने प्रियकराला भोसकले

News Desk

तेजस ठाकरेंना गोगलगायीसंदर्भात संशोधनासाठी परवानगी, आशिष शेलारांची ही प्रतिक्रिया

News Desk