HW News Marathi
मुंबई

दानवेंची ईडीमार्फत चौकशी करण्याची काँग्रेसची मागणी

मुंबई – सरकारने चलनातून बाद केलेल्या जुन्या नोटा बदलून नव्या नोटा देतो, असे जाहीर वक्तव्य करणाऱ्या भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंना तात्काळ अटक करून त्यांची सक्तवसुली संचालनालयामार्फत (इडी) चौकशी करावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. दानवे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना सावंत म्हणाले की, राज्यभरात नोटा बदलून देणाऱ्या टोळीचा सूत्रधार कोण हे रावसाहेब दानवे यांनी बुलढाणा येथे जाहीर सभेत सांगितले आहे. दानवे हे भाजपा आणि लोकसभेचेही सदस्य असल्याने त्यांच्या वक्तव्याची गंभीर दखल घेऊन सरकारने त्यांना तात्काळ अटक करावी. तसेच महाराष्ट्र प्रदेश भाजपच्या गेल्या सहा महिन्यातील सर्व व्यवहारांचीही इडी मार्फत चौकशी करावी.

सावंत पुढे म्हणाले की, नगरपालिका निवडणुकीत रावसाहेब दानवे लक्ष्मीदर्शनाबाबत बोलले होते, ते याच जोरावर. नोटबंदीच्या निर्णयानंतर भाजपाच्या अनेक नेत्यांशी संबंधित बँकांच्या गाड्यांतून कोट्यवधींच्या नव्या-जुन्या नोटा जप्त करण्यात आल्या होत्या. दानवे यांनी नोटा बदलून देण्याबाबतची जाहीर कबुली दिल्याने भाजपचे इतर नेतेही या नोटा बदलून देणा-या टोळीचा भाग आहेत असे दिसते. त्यामुळे भाजपा मंत्री आणि प्रदेश भाजपा पदाधिकाऱ्यांच्या सर्व व्यवहारांचीही चौकशी करावी, अशी मागणीही सावंत यांनी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Breaking News | वरळीतील साधना मिल कम्पाउंडला भीषण आग

News Desk

काळा घोडा कला महोत्सवाला पालकमंत्री दीपक केसरकर यांची भेट

Aprna

मुंबईतील सुविधांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Aprna