HW News Marathi
मुंबई

राणेंच्या काँग्रेसमधील भुमिकेविषयी अशोक चव्हाण साशंक?

https://youtu.be/ys6d21knDCw

परदेशातून आल्यावर यावर बोलेन – नारायण राणे

मुंबई – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे सध्या कुठे आहेत, ते पक्षात आहेत की नाहीत, त्यांचं पक्षात सध्या काय स्थान आहे, राणेंची भुमिका काय आहे, याबाबत खुद्द काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हेच साशंक आहेत का असा प्रश्न उपस्थित होतोय. हिंदुवर्ल्ड या युट्युब चॅनेलला दिलेल्या विशेष मुलाखतीत चव्हाण यांच्या राणेंबाबतच्या वक्तव्यातून ही शंका निर्माण झालीय. दरम्यान, याविषयी नारायण राणे यांची www.mahabatmi.com ने प्रतिक्रिया जाणून घेतली. मी सध्या परदेशात आहे. तीन दिवसानंतर मुंबईत येईन, त्यानंतरच यावर प्रतिक्रिया देऊ शकेल असं राणे यांनी महाबातमीशी बोलतांना सांगितलं.

हिंदुवर्ल्ड या चॅनेलचे व्यवस्थापकीय संपादक सुजीत नायर यांच्या ट्रूथ बी टोल्ड या मुलाखतीत चव्हाण यांनी राणेंच्या काँग्रेसमधील भुमिकेबाबत केलेल्या वक्तव्यानं संभ्रम निर्माण झालाय. सुजीत नायर यांनी नारायण राणे यांचं पक्षात सध्या काय स्थान आहे, ते पक्षात आहेत का, राणे सध्या कुठे आहेत, राणे काँग्रेससोबत नाहीत का, राणे भाजपमध्ये जातील का, राणेंची पक्षातील भुमिका काय असे प्रश्न अशोक चव्हाण यांना विचारले. यावर मला खरंच माहित नाही. त्यांच्या पश्चात यावर बोलण्यास मी असमर्थ आहे. त्यामुळं या प्रश्नांची उत्तरं तेच चांगली देऊ शकतील, असं चव्हाण यांनी स्पष्ट केलं. ते राज्याीतल एक मोठे नेते आहेत, त्यामुळं तेच याची उत्तरं देऊ शकतील, असं चव्हाण यांनी सांगितलं. राणे हे काँग्रेसचाच भाग आहेत, असं पक्षाला वाटतं का यावर ते जोपर्यंत काँग्रेसमध्ये आहेत, त्यांच्यावर विश्वास असल्याचं चव्हाण यांनी स्पष्ट केलं.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या निकालानंतर नारायण राणे यांनी राज्यातील पक्षनेतृत्वावर जाहीरपणे टीका केली होती. त्यानंतर काही दिवसांपुर्वी राणे आणि फडणवीस यांच्या कथित गुजरात भेटीविषयीच्या चर्चेनं जोर धरला होता. यापार्श्वभूमीवर अशोक चव्हाण यांनी राणे यांच्याबाबतीत केलेल्या वक्तव्याला महत्त्व प्राप्त होतंय.

कुठल्याही राजकीय पक्ष संघटनेच्या अध्यक्षांना पक्षातील नेते-कार्यकर्ते यांची पक्षातील भूमिका माहिती असणं अपेक्षित आहे. मात्र, नारायण राणेंसारख्या ज्येष्ठ नेत्यांच्या पक्षातील स्थानाविषयी खुद्द प्रदेशाध्यक्षांनाच माहित नसावं, हे राणे-चव्हाण वादाची तीव्रता स्पष्ट करणारं आहे, अशी चर्चा सुरू झालीय. अशोक चव्हाण यांची संपूर्ण मुलाखत पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा. https://www.youtube.com/watch?v=ILdgmbnlFao

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हिंमत असेल तर मध्यावधी निवडनुका घ्या- संजय राऊत यांचे भाजपला आव्हान

News Desk

ठाणे बदलत असल्याचे दृश्य परिणाम दिसू लागले आहेत! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Aprna

कर्जतमध्ये नीरव मोदीची तब्बल २५५ एकर जमीन

swarit