HW News Marathi
देश / विदेश

केजरीवालजी ‘आप’ भी वो’ निकले ?

  • मुख्यमंत्री केजरीवालांनी केला 400 कोटींचा टँकर घोटाळा
  • आपच्याच माजी मंत्र्यांचा आरोप

नवी दिल्ली – भ्रष्टाचाराच्या मुद्यावर आंदोलन…आपची स्थापना आणि दिल्लीत सत्ता…असा जलद प्रवास करणाऱ्या आम आदमी पार्टी अर्थात आपचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी 400 कोटी रूपयांचा टँकर घोटाळा केल्याचा आरोप आपचेच माजी मंत्री कपिल मिश्रा यांनी केला. तसे पुरावेच त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिल्यानं एकच खळबळ उडाली आहे. तसेच माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्या कार्यकाळात झालेल्या घोटाळ्याच्या चौकशीला केजरीवाल जाणूनबुजून उशीर करत असल्याचा आरोपही मिश्रा यांनी केला आहे. त्यामुळं केजरीवालजी ‘आप’भी वो निकले अशी प्रतिक्रिया सर्वत्र उमटू लागल्या आहेत.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला पुरावे दिल्यानंतर त्यांनी केजरीवाल कशा प्रकारे चौकशीसाठी टाळाटाळ करत आहेत, हेही अधिका-यांना सांगितलं आहे. मिश्रा यांनी दावा केला आहे की, मंत्री नसतानाही याची चौकशी करून त्याचा अहवाल केजरीवालांना सुपूर्द केला होता. त्यावेळी मी टँकर घोटाळ्यात दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्या विरोधात एफआयआर दाखल करून चौकशी करण्याची शिफारस केली होती. मिश्रा म्हणाले, केजरीवाल आणि त्यांच्या दोन सहका-यांशी संबंधितही टँकर घोटाळ्यातसंदर्भात पुरावे दिले आहेत. या पुराव्यांवरून शीला दीक्षित यांना वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचं स्पष्ट होत आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग याची सखोल चौकशी करण्यासाठी मला पुन्हा बोलावणार आहे, असंही मिश्रा म्हणाले आहेत. तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सहकारी मंत्री सत्येंद्र जैन यांच्याकडून दोन कोटी रुपये घेतल्याचा आरोपावर ठाम असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. तसेच त्यांनी लाय डिटेक्टर टेस्ट करण्याचीही मागणी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चेटकीण ठरवून महिलेला विष्ठा खायला लावली,हालहाल करून क्रूर हत्या

News Desk

मोदी सरकारची नवीन आखणी, 50 कोटी लोकांना होणार फायदा

News Desk

भूदल सैन्यभरती मेळाव्यांसाठी अनुदानात वाढ

Manasi Devkar