HW News Marathi
देश / विदेश

काश्मिरात ‘लष्कर’च्या दोन अतिरेक्यांना कंठस्नान

काश्मीर – येथील अतिरेकी कारवाया अद्यापही सुरूच आहेत. भारतीय सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत मंगळवारी लष्कर-ए-तोयबा या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेच्या दोन अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. या दोघांपैकी एक लष्करचा वरिष्ठ कमांडर होता.

जम्मू-काश्मीरच्या पुलवामामधील काकापोरा येथे सुरक्षा दलाचे जवान आणि अतिरेक्यांमध्ये ही चकमक उडाली. त्यातलष्कर-ए-तोयबाचा टॉप कमांडर अबू दुजानासह अन्य एका दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. या परिसरात अबू दुजानासह तीन दहशतवादी लपून बसल्याची माहिती भारतीय लष्कराला मिळाली होती. जवानांनी धडक कारवाई करून दुजानासह २ दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. दुजानाचा अनेक दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग होता. त्याच्यावर १५ लाखांचेबक्षिस होते.

सुरक्षा दलाच्या जवानांना दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर शोधमोहीम हाती घेण्यात आली. जवान आणि दहशतवाद्यांमध्ये गोळीबार सुरू होता. त्यानंतर जवानांनी दहशतवादी लपून बसले होते ते घरच स्फोटकांनी उडवून दिले. त्यात दोन अतिरेकी ठार झाले असले, तरीही त्यांचे मृतदेह अद्याप हाती आलेले नाहीत. तसेच तिसऱ्या अतिरेक्यांचा शोध सुरू आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Republic Day | ‘समृद्धी द्रुतगती महामार्ग’ महत्त्वकांक्षी प्रकल्प

News Desk

पतीने फोन उचलला नाही म्हणून आत्महत्या

News Desk

…पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘या’ मुख्यमंत्र्यांना पाठविला संदेश

Aprna