HW News Marathi
देश / विदेश

गॅसदरवाढीवरून राज्यसभेत गदारोळ

नवी दिल्ली(वृत्तसंस्था): स्वयंपाकाच्या गॅसची सबसिडी केंद्र सरकार संपवत आहे, या मुद्द्यावर मंगळवारी राज्यसभेत विरोधकांनी जोरदार गदारोळ केला. अध्यक्षांच्या समोरील जागेत उभे राहून विरोधकांनी सरकारविरोधी घोषणाबाजी केली. याच मुद्द्यावरून सोमवारीही विरोधकांनी सरकारला चांगलेच घेरले होते. काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे लोकसभेत म्हणाले की, हिंदूस्तानला लिंचिस्तान बनवून टाकले आहे. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल सारख्या संघटना आणि गोरक्षणाच्या नावाखाली चालणाºया गटांना सरकारचे अप्रत्यक्ष समर्थन आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, सरकारला जर लोकांच्या बीफ खाण्याच्या सवयीला आळा घालायचा असेल तर त्यांना मोफत डाळींचे वाटप केले पाहिजे. गेल्या काही दिवसांपासून डाळींचे दर परवडणारे नाहीत. त्यामुळे सर्वसामन्यांचे हाल होत आहेत. दरम्यान, कमी दरात बिफ मिळते, त्यामुळे काही लोक त्याला पसंती देतात, असा सुप्रिया सुळे यांच्या बोलण्याचा रोख दिसतो.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

दहशतवादाचा मार्ग पत्‍करलेल्या मुलांना त्यांच्या आईने घरी परत बोलवावे !

News Desk

मोदी सरकारकडून मुंबई लोकलसाठी तब्बल ५४ हजार कोटींचा निधी मंजूर

News Desk

ED कडून दाऊदची बहिण हसिना पारकरच्या घरी छापेमारी

Aprna
महाराष्ट्र

अकोला जिल्हाधिकाऱ्यांनी सायकलवरून वाटले सातबारा

News Desk

अकोला – मंगळवारी महसूल दिनानिमित्त स्वत: येथील जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय शेतकऱ्यांच्या वेषात अकोला तालुक्यातील चांदूर गावात सायकलने गेले आणि त्यांनी शेतकऱ्यांना संगणकीकृत सात-बारा उताऱ्यांचे वितरण केले.

सात-बारा हा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा दस्तावेज आहे. त्यामुळे शासनाने सातबारा उताऱ्यांचे संगणकीकरण करण्याचा निर्णय घेतला. काही जिल्ह्यांत हे काम अद्याप अपूर्ण असले, तरीही अकोला जिल्ह्यात ते पूर्ण झाले असून, हा संगणकीकृत सात-बारा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी स्वत: जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. मंगळवारी सकाळी ९ वाजता जिल्हाधिकारी सायकलने चांदूर गावात पोहचले. या वेळी त्यांनी संगणकीकृत सात-बाराचे शेतकऱ्यांना वितरण केले. शेतकऱ्यांशी संवाद साधून, त्यांच्या अडचणी जाणून घेणे व त्यांचे मनोधैर्य वाढविणे, हादेखील या उपक्रमामागील उद्देश आहे.

Related posts

“मी कधीही मातोक्षीवर फोन केला नाही”, नारायण राणेंचे विनायक राऊतांच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण

News Desk

दुष्काळ जाहीर करण्यासाठी सरकार मुहूर्ताची वाट का बघत आहे ?

Gauri Tilekar

माझा बाॅडीगार्ड मारहान केली नाही : एकनाथ शिंदे

News Desk