HW News Marathi
देश / विदेश

चारा घोटाळ्याचा कट रचल्याचा चालणार लालू यादव यांच्यावर खटला

नवी दिल्ली – आपल्या वक्तव्यांनी अनेकांना अडचणीत आणणाऱ्या लालूप्रसाद यादव यांच्या अडचणीत आता वाढ झालीय. सुमारे 950 कोटी रुपयांचा चारा घोटाळा त्यावेळी चांगलाच चर्चेत आला होता. राष्‍ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांच्‍या अडचणी पुन्‍हा एकदा वाढल्‍या आहेत. सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणाची सुनावणी करताना लालूप्रसाद यादव यांच्‍याविरोधात गुन्‍हेगारी कट रचल्‍याचा खटला चालवण्‍याची परवानगी सीबीआयला दिली.

झारखंड उच्च न्यायालयाने याआधीच लालूप्रसाद यादव व चारा घोटाळ्यातील इतर आरोपींवरील गुन्‍हेगारी कटाचा व इतर गुन्‍हेगारी स्‍वरुपाची कलमे हटवली होती. त्‍याविरोधात सीबीआयने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. झारखंड हायकोर्टाने 2014 मध्‍ये या प्रकरणाची सुनावणी करताना लालूंविरोधातील गुन्‍हेगारी स्‍वरुपाची कलमं हटविली होती.

सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीदरम्‍यान लालू यांचे वकिल राम जेठमलानी यांनी सांगितले की, ‘लालूंवरील सर्व आरोप एकसारखेच आहेत. त्‍यामुळे त्‍यांची एकत्रित सुनावणी करण्‍यात यावी.’ 20 एप्रिलला या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली होती. चारा घोटाळा प्रकरणी लालूप्रसाद यादव यांच्‍याविरोधात 6 खटले दाखल झाले आहेत. त्‍यातील एका खटल्‍यात त्‍यांना 5 वर्षांची शिक्षा सुनावण्‍यात आली आहे. या शिक्षेविरोधात लालू यांनी कोर्टात आव्‍हान दिले आहे. सर्वोच्च न्यायालयात उशिरा याचिका दाखल केली म्‍हणून सीबीआयला सर्वोच्च न्यायालयाने चांगलेच फटकारले होते.

असा झाला होता चारा घोटाळा?

चारा घोटाळा हा बिहारच्‍या पशुपालन विभागाशी संबधित आहे. यावेळी लालूप्रसाद यादव बिहारचे मुख्‍यमंत्री होते. 1996 मध्ये हा घोटाळा उघडकीस आला होता. पशुपालन विभागाकडून चारा खरेदीमध्‍ये तब्‍ब्‍ल 950 कोटी रुपयांचा भ्रष्‍टाचार झाल्‍याचे नंतर उघडकीस आले होते.

याप्रकरणात एकूण 56 आरोपींवर खटले दाखल करण्‍यात आले आहेत. यामध्‍ये राजकारणी, अधिकारी आणि चारा पुरवठादार यांचा समावेश आहे. या घोटाळ्याशी संबधित 7 आरोपींचा मृत्‍यू झाला आहे. दोन जण सरकारी साक्षीदार बनले आहेत. एकाजणाने आपला गुन्‍हा मान्‍य केला आहे व एका आरोपीला न्यायालयाने निर्दोष म्‍हणून सोडून दिले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सौरभ गांगुली BCCI च्या अध्यक्षपदी कायम; नवी इंनिग सुरू करणार असल्याची ट्वीटद्वारे दिली माहिती

Aprna

आता बेटांचे ही नामांतर

News Desk

ट्रम्पनंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू ‘या’ गोष्टीसाठी भारताचे मानले आभार

News Desk