HW News Marathi
देश / विदेश

जवानाच्या दु:खाला सोशल मीडियाने फोडली वाचा

सोशल मीडियाची ताकद किती आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. सीमा सुरक्षा दल, अर्थात बीएसएफमधल्या एका जवानानं सीमेवर देशाचं रक्षण करताना अधिकाऱ्यांकडून कसा त्रास दिला जातो, याची माहिती देणारा एक व्हीडिओ तयार केला आणि तो प्रचंड व्हायरल झाला. अवघ्या 24 तासांत हा व्हीडिओ गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्यापर्यंत पण पोहोचला. राजनाथ सिंह यांनी स्वतःच हा व्हीडिओ पाहिला असून त्यावर योग्य ती उपाययोजना करण्याचे आदेश गृहसचिवांना दिल्याचं ट्विट केलंय. त्यामुळे हा व्हीडिओ तयार करणाऱ्या तेज बहादूर यादव नावाच्या या जवानाला नक्कीच दिलासा मिळाला असेल.

यादवनं हा व्हीडिओ ड्युटीवर असतानाच तयार केला होता. ऊन-वारा-पावसात किंवा हिमवर्षाव सुरू असतानाही बीएसएफचे जवान कशी ड्युटी करतात, देशरक्षणाचं कार्य करतात हे सांगून त्यानं या बदल्यात कशी उपेक्षाच पदरी येते अशी कैफियत मांडलीये. ही कैफियत मांडताना ही सरकारविरोधात तक्रार नाही, पण वरिष्ठ अधिकारी कशा प्रकारे दुर्लक्ष करतायत हे त्यानं सांगितलंय.

सरकारकडून व्यवस्थित रसद पुरवली जाते. तरी अधिकाऱ्यांच्या संगनमतातून आमच्यापर्यंत काहीच पोहोचत नाही. नाश्त्याला एक परोठा, जेवताना मिळतं ते वरम म्हणजे हळद घातलेलं पाणी… या आहारावरही आम्ही 11 तास ड्युटी करतो. याची दखल पंतप्रधानांनी घ्यावी, असंही त्यानं म्हटलंय.

व्हीडिओ पाठवल्यानं जीवाला धोका

यादवनं असे तीन व्हीडिओ पाठवले आहेत. हे व्हीडिओ पाठवून मी जीव धोक्यात घालतोय. कारण अधिकाऱ्यांचे हात बरेच लांबवर पोचलेले आहेत. माझं काही बरं वाईट झालं, तर सांगता येत नाही. तरीही मी हे करतोय, असं यादव म्हणतो. त्यानं आपण 29व्या बटालियनमध्ये कार्यरत असल्याचं म्हटलंय. हे व्हीडिओ तेज बहादूर यादव याच नावाच्या आयडीवरून पोस्ट झाले आहेत.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मोदींना ई-मेलद्वारे जीवे मारण्याची धमकी

swarit

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात महाराष्ट्राचा वरचष्मा..

News Desk

दिल्लीत प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तर पंतप्रधानांच्या देशवासियांना शुभेच्छा!

News Desk