HW News Marathi
देश / विदेश

दिल्लीत महापुरूषांच्या जयंती आणि पुण्यतिथीच्या सुट्ट्या रद्द

नवी दिल्ली – दिल्लीच्या राज्य सरकारनं महापुरूषांच्या नावानं दिल्या जाणाऱ्या जयंती आणि पुण्यतिथीच्या सुट्ट्या रद्द कऱण्याचा निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी दिल्लीच्या मुख्य सचिवांना या सुट्ट्यांसंदर्भात आदेश दिले आहेत.

उत्तर प्रदेशातील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने महापुरुषांच्या जयंती आणि पुण्यतिथीच्या सुट्ट्या रद्द करण्याचा घेतलेला निर्णय चांगला आहे. दिल्ली सरकार इतर राज्यांकडून शिकण्यासाठी नेहमीच तयार आहे. मंत्र्यांच्या गाड्यांवरील लाल दिवा हटविण्याचा दिल्ली सरकारने घेतलेला निर्णय आणि विभागीय क्लिनिक देशभर राबविण्यात येत आहे. तसेच, आम्हाला सुद्धा दुस-यांकडून चांगल्या गोष्टी आत्मसात करायच्या आहेत. दरम्यान, याआधी उत्तर प्रदेशमध्ये महापुरुषांच्या जयंती आणि पुण्यतिथीच्या एकूण 15 सुट्ट्या बंद करण्याचा निर्णय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने घेतला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ओबीसी आरक्षणासाठी येत्या २६ जूनला राज्यात चक्काजाम आंदोलन ! पंकजा मुंडे आक्रमक

News Desk

बस दरीत कोसळून 30 ठार

News Desk

तामिळनाडूत ‘गाजा’ चक्रीवादळाचा धोका, ७६ हजार लोकांचे स्थलांतर

News Desk