HW News Marathi
देश / विदेश

दहशतवाद्यांना मदत करणा-या सात जणांना अटक

नवी दिल्ली: काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया करणा-या संघटनांना आर्थिक रसद पुरवल्याप्रकरणी ७ फुटीरवादी नेत्यांना राष्ट्रीय तपास संस्थेने (एआयए) अटक केली आहे. फारूक अहमद दार उर्फे बिट्टा कराटे, नईम खान, शाहीद-उल-इस्लाम, अल्ताफ फंटूस, मेहराजुद्दीन, अयाज अकबर आणि पीर सैफुल्ला अशी अटक केलेल्या फुटीरवाद्यांची नावे आहेत. बिट्टा कराटेला दिल्लीतून तर उर्वरित सर्वांना श्रीनगरमधून अटक करण्यात आली. चौकशीसाठी सर्वांना दिल्लीला नेण्यात येणार आहे.

एका वृत्त वाहिनीवर दाखवण्यात आलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये हुरियत नेता नईम खान यांनी हवालाच्या माध्यमातून पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांना आर्थिक पुरवठा केला जात असल्याचे महटले होते. या खुलाशानंतर एनआयएने या प्रकरणाचा तपास करण्यास सुरूवात केली होती. मे महिन्यात एनआयएने या प्रकरणी अनेक फुटीरतावादी नेत्यांची चौकशी केली होती. एनआयएच्या एका पथकाने तहरीक-ए-हुरियतचा फारूक अहमद दार उर्फ बिट्टा कराटे आणि जावेद अहमद बाबा उर्फ गाझीची सलग ४ दिवस चौकशी केली होती. त्यानंतर या दोघांच्या बँक खात्यांच्या माहितीसह आणि मालमत्तेच्या कागदपत्रांसह दिल्लीला बोलावले होते.

एनआयएला मिळालेल्या माहितीनुसार, काश्मीरमध्ये अशांतता पसरवण्यासाठी खोºयातील शाळा आणि इतर सरकारी मालमत्तेचे नुकसान करण्याचा कट रचला होता, अशी माहिती एनआयएला मिळाला होती. गतवर्षी ८ जुलै रोजी सुरक्षा दलाबरोबर झालेल्या गोळीबारात हिजबुलचा कमांडर बुरहान वानी ठार झाला होता. त्यानंतर उसळलेल्या हिंसाचारात काश्मीर खोºयातील अनेक शाळांचे मोठे नुकसान झाले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

पाकिस्तानची ‘मँगो डिप्लोमसी’ अयशस्वी, इम्रान खान यांचं तोंड ‘आंबट’च राहिलं – संजय राऊत

News Desk

सरन्यायाधीश दीपक मिश्रा सेवानिवृत्त, भारतीय न्यायव्यस्थेचे केले कौतुक

Gauri Tilekar

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री विरभद्र सिंग यांचं निधन

News Desk
मुंबई

महाराष्ट्राच्या हितासाठी अंहकार बाजूला ठेवला-उद्धव

News Desk

राज्यात २५ वर्षानंतर युतीची सत्ता आली. महाराष्ट्राचे भलं करण्यासाठी एक प्रयोग म्हणून भाजपसोबत सत्तेत एकत्र आलो, असं सांगतानाच भाजपसोबत कितीही वाद असले तरी अहंकार बाजूला ठेऊन महाराष्ट्राच्या हितासाठीच कमीपणा घेऊन सत्तेत थांबलो, असा खुलासा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केला.

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक ‘सामना’ मध्ये दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल करतानाच सावध पवित्राही घेतला. अडीच वर्षे झालीत. आता पहिला टप्पा कर्जमुक्तीचा आला. त्यानंतर समृद्धी महामार्गाचा आहे. विकासाच्या आड आम्ही आलेलो नाही. परंतु शेतकऱ्यांची राखरांगोळी करून आम्ही समृद्धीचा विकास होऊ देणार नाही, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.

केवळ सरकार मदत देतय म्हणून बुलेट ट्रेन करणं योग्य नाही. त्यात पैसाही जातोय आणि नुकसानही होतयं, असं सांगतानाच खरंच मुंबईला बुलेट ट्रेनची गरज आहे काय? मुंबईचे किती लोक अहमदाबादला जाणार आहेत? मुंबईच्या किती लोकांना अहमदाबादला जाण्याची गरज लागते?, असा सवालही त्यांनी केला.

तर एकला चलो रेचा मार्ग कायम

युतीचे संबंध तुटलेले आहेत. ते संबंध पूर्ववत करणे म्हणजे यू-टर्न नाही. आताशी येणे-जाणे सुरू झाले आहे. हे संबंध का बिघडले? कुठे तुटले? यावर मनमोकळी चर्चा झाली तर सुधारणा होईल, अन्यथा ‘एकला चलो रे’चा मार्ग पत्करला आहे, तो तसाच राहिल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

शिवसेना शत्रू? मग चीन आणि पाकिस्तान कोण?

भाजपच्या शिबिरांमध्ये शिवसेना नंबर एकचा शत्रू असल्याचे सांगण्यात येते, त्यावर काय वाटतं, असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर शिवसेना शत्रू वाटत असेल तर मग चीन आणि पाकिस्तान कोण? असा सवाल करतानाच शिवसेना नंबर वनचा शत्रू असल्याने त्यांचं चीन आणि पाकिस्तानकडे दुर्लक्ष झालं असावं, असा टोला त्यांनी भाजपला लगावला. उद्या जर युद्ध भडकलेच तर हिंदुस्थानची त्याला तयारी आहे काय? असा सवालही त्यांनी केला.

Related posts

दादरच्या शिवाजी पार्कमध्ये शिवजयंती उत्साहात

News Desk

पोलिसांवर झालेल्या बोचरी टीकेचा पोलीस हवालदार बळी !

News Desk

परळमध्ये पेट्रोलपंपच्या बाजूला आग; अग्निशमन दलाच्या 2 गाड्या घटनास्थळी दाखल

Aprna