HW News Marathi
देश / विदेश

पाकिस्तानच्या नव्या मंत्रिमंडळात हिंदूनेत्याचा समावेश

इस्लामाबाद – पाकिस्तानचे घोटाळेबाज पंतप्रधान नवाज शरीफ यांना पदच्युत केल्यानंतर शाहिद खाकन अब्बासी नवे हंगामी पंतप्रधान झाले आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या नव्या मंत्रिमंडळात खासदार दर्शन लाल या हिंदू खासदाराचाही समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे तब्बल वीस वर्षांनंतर पाकिस्तानात एक हिंदू नेता मंत्री होऊ शकला आहे.

दर्शन लाल यांना पाकिस्तानच्या चारही प्रांतांच्या समन्वयाची जबाबदारी देण्यात आली आहे. ६५ वर्षीय लाल व्यवसायाने डॉक्टर आहेत. सध्या ते सिंध प्रांतातील मीरपूर मथेलो शहरात वैद्यकीय व्यवसाय करतात. वर्ष २०१३ मध्ये ते पीएमएल-एन पक्षाकडून अल्पसंख्यांक कोट्यातून दुसऱ्यांदा खासदारपदी निवडून आले होते.

दरम्यान, शाहिद अब्बासी यांच्या मंत्रिमंडळाने शुक्रवारी शपथ घेतली. राष्ट्राध्यक्ष ममनून हुसेन यांनी ४७ खासदारांना मंत्रिपदाची शपथ दिली. यामध्ये १९ राज्यमंत्री आणि २८ कॅबिनेट मंत्र्यांचा समावेश आहे. नवाझ शरीफ यांच्या मंत्रिमंडळात संरक्षण आणि ऊर्जा मंत्रालय सांभाळणाऱ्या ख्वाजा आसिफ यांची अब्बासींनी परराष्टमंत्री म्हणून निवड केली आहे. त्यामुळे पाकिस्तान सरकारला २०१३ नंतर प्रथमच पूर्णवेळ परराष्ट्र मंत्री मिळाला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उपमुख्यमंत्री पदावरून हटवल्यानंतर पायलट यांची पहिली प्रतिक्रिया

News Desk

पहिल्या टप्याच्या मतमोजणीत काँग्रेसची आघाडी

News Desk

पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या बीएसएफ जवानाला अटक

Gauri Tilekar