HW News Marathi
देश / विदेश

बिहार विधानसभा निवडणूकीत शिवसेनेला धनुष्यबाण चिन्हावर लढणे अशक्य

पाटणा | बिहारमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे.यात शिवसेना बिहार विधानसभा निवडणुकीत ५० जागा लढवणार आहे. परंतु ही निवडणूक शिवसेनेला त्यांच्या धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावर लढता येणार नसल्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. बिहारमध्ये नितीशकुमार यांचा जनता दल हा पक्ष सत्तेत आहे. बाण हे जेडीयू पक्षाचे निवडणूक चिन्ह आहे. त्यामुळे शिवसेनेचे निवडणूक चिन्ह असलेल्या धनुष्यबाणावर नितीश कुमार यांच्या जेडीयूचा आक्षेप होता. त्यामुळे शिवसेना बिहारमध्ये धनुष्यबाणाच्या चिन्हावर निवडणूक लढू शकत नाही.

शिवसेनेच्या निवडणूक चिन्हामुळे मतदारांचा गोंधळ होतो. आमची मते शिवसेनेला जातात. असा दावा जेडीयूने केला आहे. तसेच शिवसेना आणि झारखंड मुक्ती मोर्चा हे स्थानिक प्रसिद्ध किंवा ओळखीचे राजकीय पक्ष नाहीत. त्यामुळे या दोन्ही पक्षांना धनुष्यबाण ही निशाणी देण्यात येऊ नये, अशी मागणी जेडीयूने केली होती. शिवसेनेचे सचिव आणि खासदार अनिल देसाई म्हणाले की, शिवसेना बिहार विधानसभा निवडणूक लढवणार आहे. आम्ही अंदाजे अंदाजे ५० जागा लढवणार आहोत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर आज (४ ऑक्टोबर) आम्ही निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे. त्यात आम्ही मागणी केली आहे की, फ्री सिम्बॉलपैकी एक चिन्ह आम्हाला देण्यात यावे. शिवसेनेचे सर्व उमेदवार त्या चिन्हावर निवडणूक लढतील.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्राकडून ११२ पद्म पुरस्कार जाहीर

News Desk

Rafale deal :  ‘देश का चौकीदार चोर हैं’ | राहुल गांधी

swarit

“तर मी आत्महत्या करेन…” राकेश टिकैत यांचा केंद्राला इशारा

News Desk