HW News Marathi
देश / विदेश

प्रेमी युगूलाची दगडाने ठेचून हत्या

बामाको पश्चिम अफ्रिकेतील माली या देशात प्रेमीयुगूलाची दगडाने मारून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोरी आली आहे. ही घटना मंगळवारी घडली आले. दोघेही लग्न न करताच एकमेकासोबत राहत होते. यांना इस्लामिक कट्टरवाद्यानी आधी दोन खड्डे खोदले आणि दोघआंना त्या खड्डयात एकमेकांससमोर उभं केलं आणि दोघांवर लोकांनी दघडफेक केली. यात दोघांचा मृत्यि झाला आहे.

गार्डियन वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार, हे प्रेमी युगूल लग्न न करताच एकमेकांसोबत राहत असल्याचा आरोप होता. त्यांनी इस्लामिक कायद्याचं उल्लंघन केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. जिहादी संघटनांना देशाबाहेर काढण्यात आल्यानंतर अशा प्रकारची समोर आलेली ही पहिलीच घटना आहे.

जिहादी संघटनांचा जेव्हा शहरावर कब्जा होता, तेव्हा त्यांनी तिथे शरिया कायदा लागू केला होता. या कायद्यांतर्गत महिलांनी बुरखा घालणे अनिवार्य करण्यात आलं होतं. नियमांचं उल्लंघन करणा-यांना शिक्षा म्हणून फटके मारले जात, तसंच दगडं मारुन त्यांचा जीव घेतला जात असे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

गणेशोत्सावासाठी येणाऱ्या परदेशी पर्यटकांचे होणार स्वागत

News Desk

बाप्पाच्या सजावटीसाठी मुंबईतील मखर अबु धाबीला

swarit

टेरर फंडिंग प्रकरणी यासिन मलिकची २२ एप्रिलपर्यंत तिहार तुरुंगात रवानगी

News Desk
देश / विदेश

भारतीय महिलेचा पाकिस्तानात जबरदस्तीने विवाह

News Desk

इस्लामाबाद – बंदुकीच्या धाकावर पाकिस्तानी नागरिकानं भारतीय महिलेशी लग्न केल्याची घटना पाकिस्तानमध्ये घडलीय. उज्मा असे महिलेचा नाव असून उज्माने पती ताहिर विरोधात इस्लामाबाद कोर्टात याचिका दाखल केली आहे. पतीने मानसिक आणि शारिरीक छळ करत असून जिवे मारण्याची धमकी देत असल्याचं याचिकेत म्हटलेलं आहे.

पतीनं माझे इमिग्रेशन दस्तावेज हिसकावल्याचंही तिने सांगितलं आहे. उज्माला जोपर्यंत सुखरूप भारतात परत पाठवलं जात नाही, तोपर्यंत तिने भारतीय दूतावास सोडण्यास नकार दिला आहे. उज्मा ही स्वतःच्या मर्जीनं तिथे राहतेय आणि पाकिस्तान परराष्ट्र कार्यालयाशी बातचीत केल्यानंतर तिला बाहेर जाण्याची परवानगी देण्यात येईल, असं भारतीय दूतावासानं सांगितलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, त्या पीडित महिलेनं 5 मे रोजी भारतीय उच्चायुक्तालयाकडे मदत मागितली होती आणि तिला आवश्यक मदत पुरवली जाणार आहे. मात्र पाकिस्तानातील पतीनं भारतीय उच्चायुक्तालयावरच भारतीय पत्नीला ताब्यात घेतल्याचा आरोप केला आहे. आम्ही दोघेही व्हिसा घेण्यासाठी भारतीय दूतावासात गेलो होतो. त्यावेळी पत्नी अचानक बेपत्ता झाली, असं त्या पाकिस्तानी व्यक्तीनं सांगितलं आहे. उज्मा आणि ताहिर अली यांची ओळख मलेशियामध्ये झाली होती. त्याच वेळी दोघांमध्ये प्रेमसंबंध जुळून आले. त्यानंतर उज्मा 1 मे रोजी वाघा-अटारी सीमेवरून पाकिस्तानात दाखल झाली आणि त्यांनी 3 मे रोजी निकाह केला.

Related posts

Cyclone Tauktae : गुजरातसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची १००० कोटींच्या मदत निधीची घोषणा!

News Desk

शिक्षित आणि संपन्न कुटुंबांमध्ये घटस्फोटाचे प्रमाण अधिक आहे !

swarit

डिस्कस थ्रोच्या फायनलमध्ये कमलप्रीत पराभूत!

News Desk