HW News Marathi
देश / विदेश

प्रसिद्ध दिग्दर्शक निशिकांत कामत यांचे निधन

मुंबई | चित्रपट समीक्षकांच्या कायम पसंतीस उतरलेले प्रसिद्ध दिग्दर्शक निशिकांत कामत यांचे आज (१७ ऑगस्ट) निधन झाले आहे. निशिकांत कामत यांची प्रकृती गेले अनेक दिवस अत्यंत चिंताजनक होती. ते लिव्हर सिरोसिस या आजाराने ग्रस्त आहेत. मागील १५ दिवसांहूनही अधिक काळ ते हैदराबादमधील खासगी रुग्णालयात त्यांना दाखल केले होते. त्यांची प्रकृती अत्यंत अधिक बिघडल्याने त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते. आज त्यांच्या निधनाची प्रेस रिलिज एआयजी या हैदराबाद येथील रुग्णालयाने दिली आहे. निशिकांत कामत यांच्या निधनाच्या बातमीने हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत शोक व्यक्त केला जात आहे. अभिनेता रितेश देशमुख यांनी ट्विट करत आपल्या मित्राला श्रद्धांजली वाहिली आहे.

निशिकांत कामत यांनी मराठी चित्रपटसृष्टीत ‘डोंबिवली फास्ट’, रितेश देशमुख आणि राधिका आपटेसोबत ‘लय भारी’, ‘फुगे’ तर अजय देवगन आणि तब्बू यांच्यासोबत ‘दृष्यम’, इरफान खानसोबत ‘मुंबई मेरी जान’ आणि ‘मदारी’, जॉन अब्राहमसोबत ‘फोर्स’ आणि रॉकी हँडसम’ या प्रसिद्ध चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. ‘सातच्या आत घरात’ हा प्रसिद्ध मराठी चित्रपटाच्या लेखनासोबत त्यांनी या चित्रपटात अभिनय देखील केला होता. अत्यंत नावाजलेल्या अशा चित्रपटांचे दिग्दर्शन केलेले निशिकांत कामत हे कायमच चित्रपट समीक्षकांच्या पसंतीस उतरले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

…तेव्हा ‘या’ भूमित छत्रपती शिवाजी महाराजच उभे ठाकतात!

News Desk

संस्कृत केवळ ब्राम्हणांची भाषा नाही

News Desk

आदित्य ठाकरेंनी मुंबईतील वायू प्रदूषणासंदर्भात केंद्रीय मंत्र्यांना लिहिले पत्र; म्हणाले…

Aprna