HW News Marathi
देश / विदेश

फेसबुक लाइव्हवर दाखवला सामूहिक बलात्कार

मुंबई – जगभरात सोशल मीडियाचा वापर वाढतो आहे. जग जवळ आणण्यात मदत करणाऱ्या या माध्यमाचा धक्कादायक गैरवापरही होऊ शकतो, हे स्वीडनमध्ये घडलेल्या एका घृणास्पद घटनेतून उघडकीस आले आहे. एका तरुणीवर सामूहिक बलात्कार करताना हा प्रकार फेसबुक लाइव्हद्वारे प्रक्षेपित करण्याचा किळसवाणा प्रकार स्वीडनमध्ये घडला आहे. या प्रकरणी तीन संशयित तरुणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

स्वीडनमधील उप्पसलामध्ये सोमवारी ही धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी एका महिलेने केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी एका अपार्टमेंटधून तिघांना ताब्यात घेतले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या तीन नराधमांनी तरुणीवर सामूहिक अत्याचार करतानाच त्याचे चित्रण केले तसेच ६० हजार मेंबर्स असलेल्या एका क्लोज्ड ग्रुपवर त्याचे लाइव्ह स्ट्रीमिंगही केले. हे पाहून जोसेफाइन लँडग्रेन या २१ वर्षीय तरुणीने पोलिसांना फोन करून या धक्कादायक घटनेची माहिती दिली. या तिघांपैकी एकाला गुन्हेगारी पार्श्वभूमीही आहे. जोसेफाइनने दिलेल्या माहितीनुसार, लाइव्ह स्ट्रीमिंग सुरू असताना प्रथम या तरुणीचे कपडे फाडण्यात आले आणि त्यानंतर तिच्यावर अत्याचार करण्यात आला. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यातही कैद करून हे फोटो स्नॅपचॅटवरही टाकण्यात आले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राहुल गांधींनी पुन्हा एकदा मोदी सरकारला दिला ‘हा’ सल्ला

News Desk

फेसबुक युजर्सचा डेटा पुन्हा एकदा लीक

News Desk

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा उच्छाद

News Desk