HW News Marathi
देश / विदेश

बिफ प्रकरणी पर्रिकरांच्या राजीनाम्याची मागणी

नवी दिल्लीः देशभरात गोमांश, गोहत्या आदी मुद्द्यावरून गोंधळ सुरू असताना गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी मात्र गोव्यात बिफचा तुटवडा पडल्यास त्याची आयात केली जाईल, असे वक्तव्य केले. त्यावर व्हीएचपी सारख्या जहाल हिंदूत्ववादी संघटनेने आक्षेप घेतला आहे. पर्रिकर यांच्या राजीनाम्याची व्हीएचपीने मागणी केली आहे. पर्रिकर यांनी भाजपची प्रतिमा मलिन केली आहे, असे विश्व हिंदू परिषदेचे नेते डॉ. सुरेंद्र जैन यांनी म्हटले आहे. भाजप हा ‘बीफ जॉय’ पक्ष झालाय का, असा सवालही जैन यांनी केला. भाजपची मलीन झालेली प्रतिमा स्वच्छ करायची असल्यास पर्रिकर यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी ट्विटद्वारे केली आहे. गोवा आणि कर्नाटकात गोहत्या बंदी आहे. हे माहिती असूनही पर्रिकर कायद्याचं उल्लंघन करत आहेत. याशिवाय कर्नाटकमध्येही ते कायद्याचं उल्लंघन करण्यासाठी प्रवृत्त करत आहेत. ही बाब शरमेची आहे. भाजपनं त्यांच्यावर कारवाई करायला हवी. अशी व्यक्ती मुख्यमंत्रीपदासाठी पात्र नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

निपाह व्हायरस म्हणजे काय?

News Desk

एल्गार परिषद प्रकरणी ‘एसआयटी’ स्थापन करणार, मलिकांची माहिती

News Desk

INX Media Case : मोदी सरकार पी. चिदंबरम यांची बदमानी करत आहे !

News Desk