HW News Marathi
देश / विदेश

बसपाची दुसरी यादी जाहीर

  • आतापर्यंत मुस्लीम समाजाला 58 जागांवर उमेदवारी

लखनऊ – उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत बहुजन समाज पक्षाने उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध केली आहे. एकूण 403 जागांपैकी 200 उमेदवारांची यादी आतापर्यंत प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक उमेदवार 58 हे मुस्लीम आहेत.

गेल्या गुरूवारी बसपाने पहिली यादी प्रसिद्ध केली. यामध्ये 36 मुस्लीम उमेदवार होते. त्यानंतर आज प्रसिद्ध झालेल्या यादीत आणखी 22 मुस्लीम उमेदवारांचा समावेश करण्यात आला आहे. राज्यात मुस्लीम मतदारांची टक्केवारी एकूण मतांच्या जवळपास वीस टक्के आहे.

बसपाने संपूर्ण 403 जागांसाठी उमेदवारांची छाननी केली असल्याचे पक्षाच्या अध्यक्ष मायावती यांनी नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले होते. 87 जागांवर दलित, 97 जागांवर मुस्लीम आणि इतर मागासप्रवर्गांना 106 जागा देण्यात येणार आहेत. तर सवर्ण समाजातील 113 उमेदवारांना उमेदवारी देण्यात येणार आहे. यामध्ये ब्राह्मण समाजाला 66, क्षत्रियांना 36 आणि कायस्थ, वैश्य, पंजाबी यांना 11 जागी उमेदवारी देण्यात येणार असल्याचे मायावती यांनी स्पष्ट केले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अखेर आशीष मिश्राला अटक

News Desk

माझा छळ कशासाठी?

News Desk

देशातील तरुणांनी महात्मा गांधींच्या अहिंसेच्या मंत्राचे कायम स्मरण ठेवावे !

swarit