HW News Marathi
देश / विदेश

मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी २४ वर्षांनी अटक

वृत्तसंस्था: मुंबईतील १९९३ च्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी आणि कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याचा जवळचा सहकारी कादिर अहमद याला आज, शनिवारी तब्बल २४ वर्षांनी उत्तर प्रदेशातील बिजनौर जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे. मुंबईत बॉम्बस्फोट घडवून आणण्यासाठी आरोपी टायगर मेमनने पाठवलेली शस्त्रास्त्रे आणि स्फोटके गुजरातमधील जामनगर येथे उतरवण्यासाठी कादिरने मदत केली होती, असा त्याच्यावर आरोप आहे.

गुजरात पोलिसांनी कादिरविरोधात अटक वॉरंट जारी केले होते. गुजरात आणि उत्तर प्रदेश दहशतवादी विरोधी पथकाने शनिवारी संयुक्त कारवाई करत कादिरला बिजनौरमधून अटक केली. उत्तर प्रदेश एटीएसचे अधिकारी विश्वजित सिंह यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली. कादिरला गुजरात येथील न्यायालयात हजर करण्यात येणार आहे, अशी माहिती उत्तर प्रदेश एटीएसचे महानिरीक्षक असीम अरुण यांनी दिली. कादिर बिजनौरमधील नजिबाबाद येथील रहिवासी आहे. मुंबईतील १९९३ च्या बॉम्बस्फोटातील तो आरोपी आहे. बॉम्बस्फोट घडवण्यासाठी मेमनने आणलेली स्फोटके आणि शस्त्रास्त्रे जामनगर येथे उतरवण्यासाठी कादिरने टायगर मेमनला मदत केली होती, असा त्याच्यावर आरोप आहे. कादिरची सध्या चौकशी सुरू आहे, अशी माहितीही पोलिसांनी दिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काश्मीरमधील सोपोरमध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

News Desk

काँग्रेस नेत्यांचं ट्विटर अकाऊंट ‘लॉक, काँग्रेस नेते म्हणतात, ‘आम्ही लढत राहू!’

News Desk

किम जोंग उन यांनी सेनाधिकाऱ्यावर ९० गोळ्या झाडल्या

News Desk