HW News Marathi
देश / विदेश

राष्ट्रपतीपदाच्या मतमोजणीस सुरुवात

नवी दिल्लीः देशाचे 14 वे नवे राष्ट्रपती निवडण्याची प्रक्रिया अर्थात मतमोजणीला गुरुवारी सकाळी सुरुवात झाली. एनडीएचे उमेदवार रामनाथा कोविंद यांची यापदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. त्यांच्या पारडण्यात 63 टक्के मतदान पडण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. तरी मीरा कुमार या युपीएच्या उमेदवार असून त्यांनाही सर्व विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला आहे. काही वेळात मतमोजणी पूर्ण होऊन राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारच्या नावाची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, कालपासून नव्या राष्ट्रपतीसाठी विशेष सुरक्षा व इतर बाबींची पूर्तता करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर खऱ्या अर्थाने एनडीए व युपीएला किती टक्के मतदान झाले हे स्पष्ट होईल, तसेच राज्यातील किती विरोध एनडीएच्या बाजूने झुकले होते, हेही स्पष्ट होणार आहे. एकूणच राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीनंतर राज्याच्या राजकारणात मोठे फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राहुल गांधींनी दिल्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अशा शुभेच्छा

News Desk

कोकणात मदतकार्यासाठी सैन्यदलांची मदत देण्याचं संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे आश्वासन

News Desk

काश्मीरमध्ये निपाणीचा जवान शहीद

News Desk