HW News Marathi
मुंबई

महिला डॉक्टराची मुलीसह आत्महत्या, पतीनेही लावला गळफास

नवी मुंबई। कामोठे परिसरात महिला डॉक्टराने आपल्या दत्तक मुलीसह आत्महत्या केल्याची खळबळजन घटना रविवारी घडली. हा प्रकार पाहून इंजिनिअर पतीनेही गळफास लावून जीवनयात्रा संपविली. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

इंद्रजीत दत्ता (50), डॉ. जस्मिन पटेल व ओशीन अशी आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत. जस्मिन पटेल या डॉक्टर असून त्या कामोठे येथील तिरुपती इमारतीत स्वतःच क्लिनिक चालवत होत्या. मात्र, स्वतः आजारपणाने त्रस्त होत्या. तसेच त्यांचे पती हे बऱ्याच वर्षांपासून घरीच असल्याने त्यांना देखील आपल्या पत्नीच्या आजारपणाच्या व स्वतः कुठे कामाला नसल्याने ते मानसिक तणावात होते. त्यातून त्यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला व आपल्या मागे आपल्या १५ वर्षाच्या मुलीचा जागून काय उपयोग या तणावात त्यांनी तिला देखील आत्महत्या करण्यास भाग पाडले.

मृतदेहांजवळ पोलिसांना दोन चिठ्ठ्या आढळल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जस्मिन पटेल यांनी आपण आजारपणाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे. गेल्या बऱ्याच काळापासून आजारी असल्याने मला जगण्यात अर्थ वाटत नाही. तसेच माझ्या मागे मुलीला एकटी सोडण्याची इच्छा नाही. त्यामुळे मी माझ्या मुलीसह आत्महत्या करत आहे. मृत्युनंतर आमचे मृतदेह विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी के. ई. एम. ला दान करण्यात यावे, असे जस्मिन यांनी आपल्या चिठ्ठीत म्हटले आहे. तर इंद्रजित दत्ता यांच्या मृतदेहाशेजारी चिठ्ठी मिळाली असून पत्नी आणि मुलीला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे पाहिल्यानंतर मलाही जगण्यात रस राहिलेला नाही. त्यामुळे मीही आत्महत्या करत आहे, असे त्यांनी त्या चिठ्ठीत म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नालेसफाईकडे पालिकेचे दुर्लक्ष, धारावीतील शेटवाडी नाला गाळ कच-याने तुडुंब

News Desk

महाराष्ट्राचे ‘उंदरालय’ सामनातून सरकारवर टीका

News Desk

कॉंग्रेस आमदारावर मनसे नेत्याचा पैशांचा पाऊस

Gauri Tilekar