HW News Marathi
देश / विदेश

सरकारी कर्मचारी कार्यालयात हेल्मेट घालून करतात काम

बिहार : वाहतूक करताना अपघात होवून डोक्याला इजा होऊ नये, यासाठी आपण हेल्मेट वापरतो. परंतु बिहारमधील शासकीय कार्यालयातील कर्मचारी दिवसभर काम करताना चक्क डोक्यात हेल्मट घालतात. होय. हे खरे आहे. याचे कारण म्हणजे बिहारमध्ये कोणी कधी कायदा सुव्यवस्था हाती घेऊन कर्मचाºयांवर हल्ला करू शकते हे नसून येथील एका कार्यालयातील सिलिंग पडण्याची भीती आहे. सध्या पावसाळी दिवस असल्याने सिलिंगमधून दिवसभर पाणी टपकते. त्यात सिलिंग पडण्याची दाट शक्यता आहे. सिलिंग डोक्यात कोसळल्यास अपघात होण्याची भीती आहे, त्यामुळे सावधानतेचा इशारा म्हणून सर्व कर्मचारी दिवसभर डोक्यात हेल्मटे घालून काम करताना दिसत आहेत. केवळ कर्मचारीच नाही तर येथे भेटण्यासाठी येणा-या नागरिकांनाही सावधानता म्हणून हेल्मेट घालण्याचा आग्रह धरला जात आहे. हे चित्र बिहार राज्यातील चंपारण्य जिल्ह्यातील आहे,

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अँगेला मार्कल चौथ्यांदा चॅन्सलर

News Desk

दिल्लीत उद्या शरद पवारांनी बोलावली बैठक,१५ पक्षांचे नेते राष्ट्रमंचाच्या झेंड्याखाली एकत्र येणार

News Desk

अखिलेश, लालूप्रसादसह चिराग पासवान यांची सुरक्षा काढली

News Desk