HW News Marathi
देश / विदेश

सेल्फी घेणा-या युवकाला हत्तींनी चिरडले

बेंगळुरू (वृत्तसंस्था) : सेल्फीच्या मोहापायी अनेकजण बळी जात आहेत. परंतु त्याचा मोह काही सुटत नसल्याचे दिसते. बेंगळुरूमध्ये हत्तींसोबत सेल्फी घेणाच्या प्रयत्न करणाºया एका युवकाला हत्तींनी चिरडून ठार केल्याची दुदैवी घटना कर्नाटकमधील बनेरघट्ट राष्ट्रीय उद्यान घडली. गिरीनगर येथे राहणारा तीस वर्षीय अभिलाष मंगळवारी बनेरघट्ट राष्ट्रीय उद्यानात गेला होता. त्यावेळी त्याने हत्तींसाठी असलेल्या क्षेत्रात प्रवेश केला होता. उद्यानाजवळ असलेल्या हक्की-पिक्की कॉलनीच्या मागील बाजूस अभिलाषने गाडी पार्क केली होती. यावेळी त्याच्यासोबत मित्रदेखील होते. अभिलाषने या उद्यानातील हत्तीसोबत सेल्फी काढण्यास सुरूवात केली होती. सेल्फीमध्ये गुंग झालेल्या अभिलाषला हत्तीची आक्रमकता समजली नाही आणि त्यातच हत्तीच्या हल्ल्ह्यात अभिलाषचा मृत्यू झाला असल्याची माहिती बनेरघट्ट राष्ट्रीय उद्यानाच्या अधिका-यानी दिली.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

देशात पहिल्या नंबरला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच!

News Desk

Russia-Ukraine War: युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्या हत्येचा कट

Manasi Devkar

कोरोनामुळे अर्थचक्र चिखलात रुतले, अर्थव्यवस्था ढासळून नये म्हणून काही सवलती देत आहोत !

News Desk
मुंबई

मुंबईसह परिसरात जोरदार पाऊस

News Desk

मुंबई- मुंबईसह उपनगरात सोमवारी पहाटेपासून जोरदार पाऊस पडत आहे. कुलाबा, नरिमन पॉइंटसह इतर भागात पहाटेपासून जोरदार पाऊस झाल्याने नागरिकांचे हाल झाले. राज्याच्या इतर भागात पावसाने काही प्रमाणात हजेरी लावल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. नाशिक, जळगावसह पश्चिम महाराष्ट्र विदर्भात देखील पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. पावसाने सातत्य ठेवल्यास खरिपाच्या पेरण्य हाती लागतील अशी शेतकऱ्यांना आशा आहे. दरम्यान येत्या 24 तासात राज्यात सर्वत्र दमदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

Related posts

मुंबई कोस्टल रोड प्रकल्पाचे सुमारे ६२ टक्के काम पूर्ण; २०२३ अखेर प्रकल्प पूर्ण होईल! – मुख्यमंत्री

Aprna

मोटरमनच्या ‘त्या’ कृत्याला रेल्वे प्रशासन जबाबदार

News Desk

Breaking News | सायन रुग्णालयात एका गोविंदाचा मृत्यू

News Desk