HW News Marathi
देश / विदेश

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्राकडून ११२ पद्म पुरस्कार जाहीर

नवी दिल्ली | केंद्राने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील ११ जणांना पद्मा पुरस्कार जाहीर झाले आहेत. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, प्रख्यात नाट्य दिग्दर्शक वामन केंद्रे, लार्सन अँड टुब्रोचे अनिलकुमार नाईक, आदिवासी भागात आरोग्यसेवा देणारे डॉ. रवींद्र व स्मिता कोल्हे, लातूरमध्ये वैद्यकीय सेवा देणारे डॉ. अशोक कुकडे, गायक-संगीतकार शंकर महादेवन यांचा समावेश आहे.

यंदा एकूण ११२ जणांना पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले असून त्यांपैकी ४ जणांना पद्मविभूषण, १४ जणांना पद्मभूषण आणि ९४ जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे यात २१ महिला समावेश असून एका तृतीयपंथी व्यक्तीला देखील पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

बाबासाहेब पुरंदरे आणि डॉ. अनिलकुमार नाईक यांना पद्मविभूषण तर डॉ. अशोक कुकडे यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे शंकर महादेवन, डॉ. कोल्हे दाम्पत्य, अभिेनेता मनोज वाजपेयी, दिनयार कॉन्ट्रॅक्टर, सामाजिक कार्यकर्ते सुदाम काटे, साहित्यिक नगीनदास संघवी, वन्यप्राणी सेवा कार्यकर्ते शब्बीर सय्यद यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

प्रसिद्ध लोकगायिका तीजनबाई यांना ‘पद्मविभूषण’ तर प्रसिद्ध पत्रकार स्व. कुलदीप नय्यर आणि हुकूमदेव यादव यांना ‘पद्मभूषण’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. अभिनेते कादर खान, क्रिकेटपटू गौतम गंभीर, नृत्यदिग्दर्शक प्रभू देवा आणि माजी अधिकारी एस. जयशंकर यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ

swarit

उद्धव जी त्या संजय रौताच्या जिभेला लगाम घाला..

Arati More

#Coronavirus : पाकिस्तानने केली भारताकडे मदतीची मागणी

News Desk