नवी दिल्ली | भारतीय वायू दलाच्या ‘मिराज २०००’ या १२ लढाऊ विमानांनी नियंत्रण रेषेपलीकडील पाकव्याप्त काश्मीरमध्ये असणाऱ्या दहशवाद्यांच्या तळावर मंगळवारी (२६ फेब्रुवारी) पहाटे तब्बल १००० किलो बॉम्ब टाकले असल्याची अत्यंत महत्त्वाचे वृत्त एएननाय या वृत्तसंस्थेने दिले आहे. पुलवामा येथील भीषण दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ही भारताकडून करण्यात आलेली अत्यंत मोठी आणि महत्त्वाची कारवाई आहे.
प्राथमिक अंदाजानुसार या भारताने केलेल्या या हवाई हल्ल्यात जैश-ए-मोहम्मदच्या ‘बालाकोट’ या दहशतवादी तळातील २०० ते ३०० दहशतवाद्यांचा खात्मा झाला असल्याची माहिती सरकारी सूत्रांकडून मिळत आहे. पाकिस्तानकडून मात्र हे सर्व अमान्य केले जात असून भारतीय हवाई दलाच्या विमानाने नियंत्रण रेषा ओलांडली मात्र आम्ही त्यांना थारा दिला नाही, असा बनावटी दावा केला जात आहे.
IAF Sources: 12 Mirage 2000 jets took part in the operation that dropped 1000 Kg bombs on terror camps across LOC, completely destroying it pic.twitter.com/BP3kIrboku
— ANI (@ANI) February 26, 2019
“भारतीय हवाई दलाच्या विमानांनी पाकिस्तानच्या हवाई हद्दीमध्ये घुसखोरी केल्याचा आरोप केला आहे”, असा आरोप पाकिस्तानी लष्कराचे मेजर जनरल आसिफ गफूर यांनी ट्विट करून केला आहे. त्याचप्रमाणे पाकिस्तानच्या विमानांनी भारताच्या विमानांना थारा दिला नसल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
Payload of hastily escaping Indian aircrafts fell in open. pic.twitter.com/8drYtNGMsm
— DG ISPR (@OfficialDGISPR) February 26, 2019
Pakistan claims "Indian Air Force violated Line of Control. Pakistan Air Force immediately scrambled. Indian aircraft gone back." pic.twitter.com/2ncIkVLqXE
— ANI (@ANI) February 25, 2019
भारतीय वायू दलाच्या या कारवाईनंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विट करत भारतीय वायू दलाला सलाम केला आहे.
🇮🇳 I salute the pilots of the IAF. 🇮🇳
— Rahul Gandhi (@RahulGandhi) February 26, 2019
भारतीय वायू दलाच्या या कारवाईत जैश-ए-मोहम्मदचा नियंत्रण कक्ष देखील उध्वस्त करण्यात आला आहे.
Sources: Balakot, Chakothi and Muzaffarabad terror launch pads across the LOC completely destroyed in IAF air strikes. JeM control rooms also destroyed pic.twitter.com/cSE0TjVsBS
— ANI (@ANI) February 26, 2019
भारतीय वायू दलाच्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन, केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची तातडीची बैठक सुरु झाली आहे.
Delhi: Meeting of Cabinet Committee on Security underway at 7, LKM pic.twitter.com/sCq0MZSB2u
— ANI (@ANI) February 26, 2019
Indian Air Force has put on high alert all air defence systems along the international border and LoC to respond to any possible action by Pakistan Air Force. pic.twitter.com/9GER7eqGPf
— ANI (@ANI) February 26, 2019
पाकव्याप्त काश्मीरमधील भारतीय हवाई दलाच्या कारवाईनंतर पाकिस्तानकडून केल्या जाणाऱ्या संभाव्य कारवाईच्या पार्श्वभूमीवर
आता हवाई दल, हवाई सुरक्षा यंत्रणेला अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.
Radio Pakistan: Pakistan Foreign Minister Shah Mahmood Qureshi has summoned an emergency meeting in Islamabad, Pakistan. The meeting will discuss the security situation. (File pic) pic.twitter.com/G2pPKna28u
— ANI (@ANI) February 26, 2019
पाकिस्तानी परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी इस्लामाबाद, पाकिस्तान येथे तातडीची बैठक बोलावली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.