नवी दिल्ली | देशात पसरलेल्या कोरोनावर मात कशी करता येईल यासाठी सर्व स्तरांतून प्रयत्न सुरू आहेत. अशातच इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) द्वारे करण्यात आलेल्या एका नॅशनल सीरो सर्व्हेेेतूून समोर आलेल्या माहितीनुसार, देशात कंटन्मेंट झोनमधील १५ ते ३० टक्के लोकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे सिद्ध झाले. न्यू इंडियन एक्स्प्रेसमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या अहवालावरून ही माहिती देण्यात आली आहे.
देशात वाढणाऱ्या कोरोनाच्या प्रादुर्भावामध्ये ICMR ने केलेला हा खुलासा अत्यंत महत्त्वाचा आणि उपयुक्त ठरणार आहे. ICMRच्या रिपोर्टमध्ये मुंबई, पुणे, दिल्ली, अहमदाबाद, कोलकत्ता, चेन्नई, सुरत, जयपूर आणि इंदोर यांसारख्या शहरांच्या हॉटस्पॉट आणि कन्टेन्मेंट झोनमधून मिळणाऱ्या आकड्यांच्या हवाल्याने हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
ICMR ने दिलेल्या माहितीनुसार, या ठिकाणी कोरोनाच्या संसर्गाचा दर अत्यंत जास्त आहे. येथे इतर हॉटस्पॉटच्या तुलनेत १०० पटींनी जास्त संसर्ग झाल्याचे निदर्शनास आले. हा अहवाल युनियन कॅबिनेट सेक्रेटरी आणि पीएमओलाही पाठवण्यात आला आहे.
ICMR च्या अहवालात असेही सांगण्यात आले आहे की, हा सर्वे रुग्णांकडून घेण्यात आलेल्या रक्तांच्या नमुन्यांमध्ये SARS-CoV-2च्या विरोधात तयार होणाऱ्या IgG एंटीबॉडीचा शोध घेण्यासाठी करण्यात आला होता.
दरम्यान, एंटीबॉडी रुग्णांच्या शरीरात कोरोनाशी लढण्यासाठी तयार होतात. संसर्ग झाल्यानंतर १४ दिवसांनी दिसतात आणि संसंर्ग संपल्यानंतरही अनेक महिन्यांपर्यंत रुग्णांच्या रक्तात सीरममध्ये राहतात. हा सीरो सर्व्हे नॅशनल सेंटर फॉर डिजीज कंट्रोल (NCDC), डब्ल्यूएचओ इंडिया आणि राज्य सरकारच्या सहकार्याने पूर्ण करण्यात आला आहे. यामध्ये देशाच्या ७० जिल्ह्यांमधून जवळपास २४००० नमूने घेण्यात आले होते.त्यांचा अहवाल येणे अजून बाकी आहे.
The findings appeared in media related to ICMR Sero Survey for COVID-19 are speculative and survey results yet to be finalised. #IndiaFightsCorona @PIB_India @CovidIndiaSeva
— ICMR (@ICMRDELHI) June 9, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.