HW News Marathi
देश / विदेश

राज्यसभा निवडणुकीपूर्वी गुजरात काँग्रेसच्या २ आमदारांची पक्षाला सोडचिट्ठी

नवी दिल्ली | देशभरात एकीकडे कोरोनामुळे काहीशी तणावपूर्ण स्थिती असताना दुसरीकडे राजकीय हालचाली देखील सुरूच असलेल्या पाहायला मिळत आहेत. याच पार्श्वभूमीवर, आता काँग्रेसला एक धक्का बसला आहे. गुजरात काँग्रेसच्या २ आमदारांनी पक्षाला सोडचिट्ठी दिली आहे. गुजरातमधील करजन विधानसभा मतदारसंघातील कॉंग्रेस आमदार अक्षय पटेल आणि जीतू चौधरी यांनी बुधवारी (३ जून) आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. गुजरात विधानसभा अध्यक्षांनी देखील त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे. गुजरातमध्ये येत्या १९ मे रोजी राज्यसभेच्या ४ जागांसाठी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर, गुजरात काँग्रेससाठी हा मोठा धोका मानला जातो.

“मी काँग्रेसच्या दोन्ही आमदारांचा राजीनामा स्वीकारला आहे. ते आता आमदार राहिलेले नाहीत”, असे गुजरात विधानसभा अध्यक्ष राजेंद्र त्रिवेदी यांनी म्हटले. गुजरात विधानसभेत एकूण १८२ सदस्य आहेत. १०३ आमदार सत्ताधारी भाजपचे तर ६६ आमदार हे विरोधी पक्ष असलेल्या कॉंग्रेसचे आहेत. मार्च महिन्याच्या सुरुवातीला त्यापैकी कॉंग्रेसच्या ५ आमदारांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. तर आता आणखी २ आमदारांनी देखील आपला राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सुपूर्द केला आहे.

अक्षय पटेल हे वडोदरामधील करंजनचे आमदार होते तर जीतू चौधरी यांनी वलसाडच्या कापराडा मतदारसंघातून निवडणूक जिंकली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

१८० शेतकरी संघटना आंदोलनाच्या तयारीत

News Desk

भारत जोडो यात्रेदरम्यान माजी मत्री नितीन राऊत यांच्या डोळ्याला गंभीर दुखापत

Aprna

मराठा आरक्षणासाठी आंदोलन करायची वेळ येते हे दुर्दैवच ! उदयनराजे संतापले

News Desk