HW News Marathi
देश / विदेश

2 हजारांच्या बनावट नोटांचीही पाकिस्तानात छपाई

पाकिस्तानने पुन्हा एकदा भारतीय चलनातील 2 हजार रुपयांच्या नव्या नोटाही छापण्यास सुरुवात केल्याचे वृत्त आहे. या नोटा तस्करांमार्फत भारत-बांगलादेश सीमेवरुन भारतात आणल्या जात असल्याचीही माहिती आहे. एनआयए आणि बीएसएफने मुर्शिदाबाद येथून अटक केलेल्या अझीझूर रहमान याच्या चौकशीतून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.

रहमान मूळचा पश्चिम बंगालमधील मालदाचा निवासी आहे. त्याच्याकडे 2 हजार रुपयांच्या 40 बनावट नोटा सापडल्या. पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआयच्या मदतीने या नोटा पाकिस्तानात छापण्यात आल्याची माहिती त्याने चौकशीत दिली. बांगलादेश सीमेवरुन या नोटांची तस्करी चालते असेही त्याने सांगितले.

2 हजार रुपयांच्या बनावट नोटा भारतात पोहोचवण्यासाठी तस्करांना प्रत्येक नोटेमागे 400 ते 600 रुपये मोजावे लागतात अशी माहिती सूत्रांनी दिली. जप्त केलेल्या बनावट नोटांचा तपासकर्ते आणि तज्ज्ञांनी अभ्यास केल्यानंतर सुरक्षेविषयी 17पैकी 11 फीचर्सची नक्कल झाल्याचे स्पष्ट झाले आहे. वॉटरमार्क, अशोक स्तंभ, डाव्या बाजूला लिहीलेले ‘Rs 2000’, देवनागिरीमध्ये लिहीलेला क्रमांक याची हुबेहूब नक्कल करण्यात आली आहे. ख-या नोटांशी या नोटा मिळत्या-जुळत्या वाटत असल्या तरी, त्यांची छपाई आणि कागदाचा दर्जा सुमार असल्याचे तपासकर्त्यांनी सांगितले. मात्र या प्रकारामुळे नोटबंदीच्या निर्णयाच्या यशावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटबंदीचा निर्णय घेताना पाकिस्तानात छापल्या जाणाऱ्या बनावट नोटांचेही कारण दिले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘सीएए’चा देशातील मुस्लीम नागरिकाला धोका नाही, सरसंघचालकांचं वक्तव्य

News Desk

शरद पवार आणि संजय राऊत दिल्लीला रवाना

News Desk

योगीजी राजीनामा द्या, फक्त पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन करून जबाबदारी झटकू नका !

News Desk