HW News Marathi
देश / विदेश

पुलवामामध्ये दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत मेजरसह ४ जवान शहीद

श्रीनगर | जम्मू-काश्मीरमधील पुलवामा झालेल्या दहशतवादी हल्ल्याची घटना ताजी असताना आज (१८ फेब्रुवारी) पुन्हा एकदा भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. पुलवामामधील पिंगलान भागात दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला असून, जवानांनीही याला चोख प्रत्युत्तर देत आहेत. दहशतवादीसोबत झालेल्या चकमकीत दरम्यान चार जवाना शहीद झाल्याची माहिती मिळाली आहे. एका घरात लपलेल्या दहशतवाद्यांना जवानांनी घेरले असून चकमक सुरू आहे. या घरातून दहशतवादी जवानांवर गोळीबार करत आहेत. यामध्ये एका नागरिकाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. या हल्लयात मेजर शहीद झाले आहेत.

पुलवामामध्ये गुरुवार (१३ फेब्रुवारी) दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या एका बसवर हल्ला केला होता. हल्ल्यात ४० जवान शहीद झाले होते. या हल्ल्याची जबाबदारी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने स्वीकारली होती. त्यानंतर काश्मीरमध्ये सुरक्षा जवानांनी जोरदार सर्च ऑपरेशन राबवले असून, याचदरम्यान ४ दहशतवादी पिंगलान येथे लपून बसल्याची माहिती जवानांना मिळाली. जवानांनी परिसराला चारही बाजूंनी घेरले असून, दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये चकमक सुरू आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अमेरिकेत शिक्षणासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थ्यांनादेखील माघारी परतावं लागू शकते

News Desk

Goa Elections : मोठी बातमी! उत्पल पर्रिकर पणजीतून अपक्ष निवडणूक लढवणार

Aprna

पंतप्रधानांच्या ‘त्या’ वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला, पंतप्रधान कार्यालयाचे स्पष्टीकरण

News Desk