HW News Marathi
देश / विदेश

कपड्याच्या कारखान्याला भीषण आग, ४ जणांचा मृत्यू

लुधियाना | लुधिकयानाच्या कल्याण नगरमधील कपड्याच्या एका कारखान्याला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत चार कामगारांचा होरपळून मृत्यू झाला आहे. ही घटना बुधवारी (१० ऑक्टोबर)ला पहाटे ४.१५च्या सुमारास तीन मजली कारखान्याला आग लागली आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाचे जवाना आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. या कपड कारखान्याचा मालक मंगळवारी रात्री नेहमीप्रमाणे या कारखान्याला ताळे लावून जात घरी गेला. कारखान्याला बाहेरून ताळे असल्यामुळे कामगारांना बाहेर पडता आले नाही. आगीचे कारण अद्याप कळू शकलेले नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

अयोध्येत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही अतिथी राहणार अनुपस्थितीत

News Desk

नियंत्रण रेषेवर पाकिस्तानची कुरघोडी कायम, भारतीय सैन्याकडून चोख प्रत्युत्तर

News Desk

Kathua Rape Case : पीडित मुलीच्या कुटुंबीयांनीच महिला वकिलाला हटवले

News Desk
देश / विदेश

राहुल गांधींचा ढोलपूरमध्ये रोड शो

swarit

ढोलपूर। “मोदी सरकारने घेतलेल्या जीएसटी आणि नोटबंदीच्या निर्णयामुळे देशाची आर्थिक व्यवस्था विस्कटली आहे”,अशी टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजप सरकारवर केली आहे. उत्तर प्रदेश व मध्य प्रदेशच्या सीमेलगत असलेल्या राजस्थानमधील ढोलपूर जिल्हातील मनिया गावात प्रचाराच्या दरम्यान ते बोलत होते. राज्यस्थानमध्ये डिसेंबर महिन्यात निवडणूक जाहीर झाल्या आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राहुल यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे.

राहुल म्हणाले की, आपल्याला चौकीदार बनायचे आहे, असे मोदी २०१४ च्या निवडणुकांतील प्रचारसभांमध्ये केलेल्या भाषणात सांगत असत. मात्र,”नेमका कोणाचा चौकीदार व्हायचे आहे हे त्यांनी कधीही सांगितले नाही”. राहुल गांधी यांनी ढोलपूर मधून रॉड शो ला सुरुवात केली. हा रोड शो १५० किमीचा होता केला. राहुल आज ( १० ऑक्टोम्बर) बिकानेरला जायण्यास निघाले आहेत. मोदी सरकारने एक रुपयाची सुद्धा कर्ज माफी केली नाही. “सरकारने राबविलेल्या मेक इन इंडिया योजनेंतर्गत मोबाईल व टी-शर्टच्या निर्मितीसाठी केलेले प्रयत्न अयशस्वी ठरले आहेत”,असा टोला ही राहुल गांधी यांनी भाजप सरकारवर लगावला.

छत्तीसगढ, राजस्थान, उत्तर प्रदेश, तेलंगणा,मध्य प्रदेश,मिझोराम या पाच राज्यांच्या निवडणूका जाहीर झाल्या आहेत. २८ नोव्हेंबरला मिझोराम आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांमध्ये निवडणूक होणार आहे. ११ डिसेंबरला या पाचही राज्यांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत.

Related posts

लस येत नाही तोवर आपल्याला कोरोनाशी युद्ध सुरुच ठेवायचं आहे

News Desk

गुगलमुळे हत्येच्या कटातून सुटका

News Desk

सलग ११व्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत घट

News Desk