HW Marathi
देश / विदेश

अंतराळात ‘मिशन शक्ती’मुळे ४०० तुकडे, नासाची भीती

वॉशिंग्टन | भारतीय शास्त्रज्ञांनी अंतराळातील कृत्रिम उपग्रह पाडणार्‍या क्षेपणास्त्राची (ए-सॅट) यशस्वी चाचणी केली होती. ओडिशातील बालासोर येथील ‘डीआरडीओ’च्या परीक्षण केंद्रावरून प्रक्षेपित केलेल्या ‘ए-सॅट’ने सुमारे ३०० किलोमीटर अंतरावरील उपग्रह अवघ्या तीन मिनिटांत टिपल्यानंतर लक्ष्य भेदण्यात यश आले आहे. ‘मिशन शक्ती’ असे या मोहिमेला नाव देण्यात आले.

अमेरिकेच्या अवकाश संशोधन संस्थेने (नासा) वेगळीच भिती व्यक्त केली आहे. नासाने सांगितले की, भारताची मिशन शक्ती ही मोहीम भयानक असून पाडलेल्या उपग्रहाचे ४०० तुकडे अंतराळात पसरले आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातील (इंटरनॅशनल स्पेस स्टेशन) अंतराळवीरांना नवीन धोका निर्माण झाला आहे, असे नासाने म्हटले आहे. भारत शत्रू राष्ट्राचा उपग्रह पाडण्याची क्षमता असलेला अमेरिका, रशिया आणि चीननंतर जगातील चौथा देश बनला, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः दिली होती.

जिम ब्रिडेनस्टाइन यांनी म्हटले आहे की, भारताने पाडलेल्या उपग्रहाचे तुकडे एवढे मोठे नाहीत त्यांना ट्रक करता येईल. आम्ही त्यावर लक्ष ठेवून आहोत. आम्ही १० सेंटीमीटर (६ इंच) पेक्षा मोठ्या तुकड्यांविषयी सांगत आहोत. आतापर्यंत असे ६० तुकडे मिळाले आहेत. भारताने लो अर्थ ऑर्बिटमधील ३०० किलोमीटरवरील उपग्रह पाडला. ही चाचणी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकासह अंतराळ कक्षेत असलेल्या सर्व उपग्रहांच्या खाली घेण्यात आली आहे. परंतु या चाचणीनंतर पाडलेल्या उपग्रहाचे २४ तुकडे अंतराळ स्थानकाच्या वरच्या बाजून पोहचले आहेत. हे खूप धोक्याचे असल्याचे नासाने सांगितले आहे.

Related posts

संयुक्त राष्ट्र संघात भारताचा विजय

अपर्णा गोतपागर

अधिकवेळा एटीएममधून पैसे काढल्यास दंड भरावा लागणार

News Desk

#PulwamaAttack : दहशतवाद्यांनी आपले तळ पाकिस्तानी लष्कराच्या जवळ नेले

News Desk