HW News Marathi
देश / विदेश

कुलभूषण जाधव यांना वकिल देण्यास लाहोरच्या बार कौन्सिलचा नकार

लाहोर – रॉ एजंट असल्याचा दावा करत फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांची केस कुणीही लढणार नाही, लढल्यास त्या वकिलावर कारवाई केली जाईल, असा इशाराच लाहोर हायकोर्ट बार असोसिएशनने दिला आहे.

जो वकील कुलभूषण जाधव यांची केस लढेल, त्याचं सदस्यत्व रद्द केलं जाईल, असा निर्णय बार कौन्सिलच्या बैठकीत घेण्यात आला, अशी माहिती लाहोर हायकोर्ट बार असोसिएशनचे महासचिव आमेर सईद रान यांनी दिली.

भारताकडून कुलभूषण यांची फाशी रद्द करण्यासाठी दबाव आणला जात आहे. मात्र पाकिस्तान सरकारने कोणत्याही दबावापुढे न झुकता कुलभूषण जाधव यांना फाशी द्यावी, अशी मागणी पाकिस्तानच्या वकिलांनी केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

न्यायालयाकडून राम रहिमला जामीन मंजूर, परंतु २० वर्षे तुरुंगवासाची शिक्षा

Gauri Tilekar

“जर तो लवंगी फटाका होता, तर एवढे का घाबरले?”,फडणवीसांचे राऊतांना प्रत्युत्तर  

News Desk

“स्फोटक प्रकरणात अंबानींची तक्रार कुठे ?”, वकील असीम सरोदेंचा सवाल

News Desk