HW News Marathi
देश / विदेश

हनी ट्रॅपमध्ये अडकले ५० भारतीय जवान ?

नवी दिल्ली | भारतीय सैन्याचे हनी ट्रॅपमध्ये ५० जवान अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या हनी ट्रॅपमध्ये अडकलेल्या सोमवीर नावाच्या एका जवानाने एका पाकिस्तानी तरुणीला सोशल मीडियाच्या माध्यमातून लष्करासंबंधीची अत्यंत संवेदनशील माहिती दिल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे सोमवीरला शुक्रवारी (११ जानेवारी) जैसलमेरमधून अटक करण्यात आली होती. लष्कराकडून या प्रकरणाची चौकशी सुरु आहे.

सोमवीर हा फेसबुक आणि व्हॉटसअपच्या माध्यमातून एका तरुणीशी संवाद साधत होता. या महिलेने सोमवीरला अडकविण्यासाठी काही अश्लील फोटोज पाठविले ज्याच्या बदल्यात सोमवीरने भारतीय लष्कराशी संबंधित माहिती या महिलेला पुरविली आहे. लष्कराचे टँक, हत्यारबंद वाहने, हत्यारे आणि लष्करी कंपन्यांच्या स्थितीबाबतची माहिती या महिलेला पुरवली होती. ही माहिती पुरविल्यानंतर या महिलेने या सोमवीरला ५००० रुपये दिल्याची देखील माहिती समोर आली आहे.

अनिका चोप्रा या नावाने या महिलेचे फेसबुक अकाऊंट असून हे फेसबुक अकाऊंट आयएसआयकडून चालविले जात असल्याचा संशय लष्कराकडून व्यक्त केला जात आहे. या फेसबुक अकाऊंटच्या फ्रेंडलिस्टमध्ये सोमवीरसह अन्य ५० भारतीय जवानांची नावे असल्याने हे जवानदेखील या हनी ट्रॅप अडकल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यादरम्यान अतिदक्षतेचा इशारा

News Desk

ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नय्यर यांचं निधन

swarit

मेट्रो सेवा टप्प्याटप्प्यानं सुरू करण्याचा केंद्राचा विचार

News Desk