तिरुचिरापल्ली | तामिळनाडूमधील एका मंदिरात रविवारी (२१ एप्रिल) झालेल्या चेंगराचेंगरीत ७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १० जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तामिळनाडूमधील मुथियमपलयम गावातील मंदिरात आयोजित एका कार्यक्रमादरम्यान ही घटना घडली आहे. मंदिराच्या शिक्का वितरणादरम्यान ही चेंगराचेंगरी झाल्याची माहिती मिळत आहे.
An ex- gratia of Rs 2 lakh each for the next of kin of those who passed away has been approved from the PM’s National Relief Fund. Rs 50,000 each for the injured has also been approved.
— Narendra Modi (@narendramodi) April 21, 2019
पंतप्रधान मोदींनी याबाबत दुःख व्यक्त केले असून मृतांच्या कुटुंबाप्रती संवेदना देखील व्यक्त केल्या आहेत. पंतप्रधान मोदींनी या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना २ लाखांचा मदत निधी जाहीर केला असून जखमींना देखील ५०,००० रुपयांचा निधी जाहीर केला आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.