दंतेवाडा | छत्तीसगढमधील दंतेवाडा जिल्ह्यात पोलीस आणि नक्षलवादी यांच्यात चकमक झाली. या चकमकीत पोलिसांनी नक्षलवाद्यांचे कॅम्प उद्ध्वस्त केले असून यात आठ नक्षलवाद्यांना अटक करण्यात आले आहे. दंतेवाडा येथील किरंदुल पोलीस स्टेशन परिसरात असलेल्या हिरोली डोकापारामध्ये पोलीस आणि नक्षलवादी यांच्यात चकमक झाली. यावेळी नक्षलवाद्यांकडून वेगवेगळ्या ठिकाणी गोळीबार करण्यात आला. परंतु पोलिसांना नक्षलवाद्यांना सडेतोड उत्तर देत कॅम्प उद्ध्वस्त केले आणि नक्षलवाद्यांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक अभिषेक पल्लव यांनी दिली आहे.
Abhishek Pallav, SP Dantewada: Police busted a Naxal camp and arrested eight Naxals following an exchange of fire between police and Naxals in Hiroli. (29.11)#Chhattisgarh pic.twitter.com/URNohXjacw
— ANI (@ANI) November 29, 2018
डीआरजी, सीआरपीएफ आणि किरंदुल पोलिसांनी संयुक्तरित्या नक्षलवाद्यांवर ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी अटक केलेल्या नक्षलवाद्यांकडून शस्त्रसाठा जप्त केला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी छत्तीसगढमधील नक्षलग्रस्त भाग असलेल्या सुकमा जिल्ह्यात सुरक्षा रक्षक आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली होती. या चकमकीत आठ नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा रक्षकांना यश आले. परंतु या चकमकीत दोन जवानही शहीद झाले होते.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.