HW News Marathi
देश / विदेश

पूरग्रस्त गुजरातसाठी पाचशे कोटींची मदत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातकडे धाव घेत पूरग्रस्त भागांची हवाई पाहणी केली. तसेच मोदी यांनी तातडीने पाचशे कोटी रुपयांचा मदतनिधीही जाहीर केला. मुसळधार पावसानंतर गुजरातला पुराचा फटका बसला आहे. राज्यातील बनासकांठा आणि पाटण या जिल्ह्यांचे सर्वाधिक नुकसान झाले असून, अद्यापही जिल्ह्यातील अनेक गावे पुराने वेढली गेली आहेत. दिल्लीहून येथे येताच मोदींनी विमानतळावरच सुमारे तासभर मंत्री आणि अधिकाºयांची बैठक घेतली. या बैठकीला मुख्यमंत्री विजय रूपानी, उपमुख्यमंत्री नितीन पटेल आणि माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल हे उपस्थित होते. या वेळी मोदी यांना पुराबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. यानंतर मोदींनी संबंधितांना विविध सूचना केल्या. पूरग्रस्त भागांमध्ये मदत करण्यासाठी भारतीय हवाई दलाची आणखी दहा हेलिकॉप्टर पाठविणार असल्याचे मोदी यांनी या वेळी सांगितले. केंद्र सरकारकडून राज्याला पाचशे कोटी रुपयांची तातडीची मदत जाहीर करतानाच त्यांनी पुरामध्ये मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाइकांना दोन लाख रुपये आणि जखमी झालेल्यांना पन्नास हजार रुपयांची नुकसानभरपाईही जाहीर केली. या पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकºयांना मदत करण्यासाठी सर्व प्रयत्न करण्याचे आश्वासन मोदींनी दिले. पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी तातडीने पथके पाठविली जाणार आहेत. पूरग्रस्त भागांमध्ये लष्कर, भारतीय हवाई दल आणि राष्ट्रीय आपत्कालीन बचाव पथकाचे जवान येथे नागरिकांना मदत करत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जम्मू-काश्मीरच्या बडगाम येथील चकमकीत २ दहशतवाद्यांना कंठस्नान

News Desk

लवकरच महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नव्या नेत्याची वर्णी लागणार ?

News Desk

बजेटमुळे नाराजी, सेन्सेक्स घसरला

News Desk