HW News Marathi
देश / विदेश

अंडरवर्ल्ड अबू सालेमला 22 ऑगस्टला शिक्षा

मुंबईः अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमसह अन्य चार जणांना १९९३ साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी शिक्षेची सुनावणी 22 ऑगस्ट रोजी होणार आहे. टाडा न्यायालयाने यापूर्वीच सर्वांना दोषी ठरवले आहे. दोषी ठरवलेल्यांना कोणती शिक्षा द्यावी, याबाबत विशेष वकील व बचावपक्षांच्या वकिलांचा युक्तिवाद गुरुवारी पूर्ण झाला आहे.

मुंबई बॉम्बस्फोट खटल्याच्या केस बीचा १६ जून रोजी विशेष टाडा न्यायालयाने निकाल दिला. अबू सालेमसह,मुस्तफा डोसा, ताहीर मर्चंट, फिरोज रशीद खान, करीमुल्ला खान यांना विशेष न्यायालयाने दोषी ठरवले. तर रियाझ सिद्दिकीला टाडा कायद्याअंतर्गत दोषी ठरवले, अब्दुल कय्युम याच्यावरील आरोप सिद्ध करण्यास सरकारी वकील अपयशी ठरले, असे म्हणत न्या. सानप यांनी कय्युमची सुटका केली. या सर्व दोषींना कोणती शिक्षा ठोठावायची याबाबत सीबीआय वकील व बचावपक्षाच्या वकिलांनी युक्तिवाद केला. सीबीआयच्या वकिलांनी सालेम सोडून सर्वांना फाशी देण्याची विनंती केली. बचावपक्षाच्या वकिलांनी दोषींना दया दाखवण्यात यावी आणि कमीत कमी शिक्षा द्यावी, अशी विनंती न्यायालयाला केली. गुरुवारी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाल्यावर विशेष न्यायालयाने २२ आॅगस्ट रोजी निकालाची तारीख जाहीर करू, असे स्पष्ट केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

इस्रोचा नवीन इतिहास – अंतराळात भारताचे १०० उपग्रह

News Desk

कोरोनासोबतच दिल्लीकर भुकंपाच्या धक्क्याने धास्तावले

News Desk

अडीचशे वर्ष जगलेल्या माणसाची कथा

News Desk