HW News Marathi
देश / विदेश

रशियात एमर्जन्सी लँडिंगदरम्यान विमानाला आग, ४१ जणांचा मृत्यू

मॉस्को | रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये एमर्जन्सी लँडिंगदरम्यान सुखोई सुपरजेट १०० विमानाला आग लागली आहे. या विमानातील ४१ जणांचा मृत्यू झाला. मॉस्कोच्या विमानतळावर ही घटना घडली. यावेळी अनेक प्रवाशांना एमर्जन्सी स्लाईड्सच्या माध्यमातून बाहेर काढण्यात आले. सुखोई प्रवासी विमानाने मॉस्को विमानतळावरुन उत्तर रशियातल्या मोरशांस्कला जाण्यासाठी उड्डाण केले होते. विमानाला आग नेमक्या कोणत्या कारणामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार विमानात एकूण ७८ प्रवासी प्रवास करत होते. त्यापैकी ४१ लोकांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये लहान मुलांचादेखील समावेश आहे. विमान झेपावताच त्यातून धूर निघू लागला. टेकऑफनंतर काहीच वेळात विमानात तांत्रिक बिघाड झाला. वैमानिकाने यांची माहिती विमान वाहतूक नियंत्रण कक्षाला दिली. यानंतर विमानाची एमर्जन्सी लँडिंग करण्याच्यादरम्यान इंजिनने पेट घेतला

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

प्रसिद्ध तेलुगू अभिनेता जयप्रकाश रेड्डी यांचे निधन

News Desk

सोनिया गांधी रुग्णालयात उपचार घेत असतानाच नेतृत्वावरुन पत्र का पाठवले? राहूल गांधींचा सवाल

News Desk

बिहार विधानसभा निवडणूकीची तारीख ठरली, ३ टप्प्यांत होणार मतदान!

News Desk