HW Marathi
देश / विदेश राजकारण

कलम ३७० रद्द करण्याविरोधी याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

नवी दिल्ली । मोदी सरकारने जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. त्याचप्रमाणे जम्मू-काश्मीर आणि लडाख या दोघांनाही स्वतंत्र केंद्रशासित प्रदेशांचा दर्जा दिला. दरम्यान, सरकारच्या कलम ३७० रद्द करण्याच्या तसेच काश्मीरचे विभाजन करण्याच्या या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर आज (१६ ऑगस्ट) सुनावणी होईल.

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्यायाधीश एस. ए. बोबडे आणि न्यायाधीश एस. अब्दुल नजीर यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी होईल. काश्मीरमधील कलम ३७० रद्द करणे हा चुकीचा निर्णय असून विधानसभेत प्रस्ताव न देता जम्मू-काश्मीरचे अशा विभाजन होणे अवैध आहे, असे याचिकाकर्ते वकील एम.एल.शर्मा यांनी म्हटले आहे.

काश्मीर टाइम्सच्या संपादक अनुराधा भसीन यांच्या याचिकेवरही आज सुनावणी केली जाईल. काश्मीरमध्ये लागू करण्यात आलेले कलम १४४, मोबाईल-इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद केल्याने सामान्य नागरिक तसेच पत्रकारांना इथे काम करताना वारंवार होणार त्रास, वार्तांकन करताना निर्माण होणाऱ्या समस्या या सर्व बाबींचा उल्लेख अनुराधा भसीन यांनी आपल्या याचिकेत केला आहे.

Related posts

बारामती जिंकण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मुख्यमंत्र्यांना पवारांच्या शुभेच्छा

News Desk

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कर्नाटक दौऱ्यातील काळ्या बॉक्समध्ये दडलेय तरी काय ?

News Desk

संभाजी ब्रिगेड आगामी निवडणुका लढवणार

News Desk