HW News Marathi
देश / विदेश

सिक्कीममध्ये लष्करी वाहनाला मोठा अपघात;16 जवानांचा मृत्यू तर 4 जवान जखमी

मुंबई | उत्तर सिक्कीमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. उत्तर सिक्की भागात लष्कराच्या वाहन खोल दरीत कोसळल्याने 16 जवानांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत चार जवान जखमी झाल्याची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि लष्कराकडून युद्ध पातळीवर बचावकार्य सुरू आहे. लष्कराची तीन वाहने हे आज (23 डिसेंबर) सकाळच्या सुमारास चट्टेन उत्तर सिक्कीमच्या येथून थांगू दिशेने निघाले होते. यादरम्यान चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहन दरीत कोसळले.

दरम्यान, या दुर्घटनेबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ट्वीट व्यक्त करत शोक व्यक्त केला आहे. या ट्वीटमध्ये राजनाथ सिंह म्हणाले, “उत्तर सिक्कीमध्ये रस्ते अपघातात भारतीय लष्कराच्या जवानांना बलिदानामुळे खूप दुःख झाले आहे. देश सेवा आणि त्यांच्या कर्तव्याबद्दल त्यांची कृतज्ञ आहे. या दुर्घटनेत जखमी झालेले जवान लवकरात लवकर बरे होतील.”

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मला हंगामी अध्यक्षपदाच्या जबादारीतून मुक्त करा – सोनिया गांधी

News Desk

दिल्लीतील अनाज मंडी परिसरात भीषण अग्नितांडव, ४३ जणांचा मृत्यू

News Desk

#DelhiElectionResults Live Updates | तिसऱ्यांदा अरविंद केजरीवाल मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार

swarit