HW Marathi
Covid-19 देश / विदेश राजकारण

जाणून घ्या…सार्वजनिक ठिकाणी मास्क न घातल्याने दंड भरलेले ‘ते’ पंतप्रधान कोण?

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशवासियांना संबोधित केले. देशात अनलॉक १ सुरू झाल्यापासून नागरिकांचा निष्काळजीपणा आणि बेजबाबदारपणा चिंतेचा विषय ठरत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हटले. मात्र,  कोरोनाचा सामना करताना आपल्याला काळजी घेणे आणि कोरोनाला रोखण्यासाठी नियामांचं पालन करण्याचीही आवश्यकता आहे, असे सांगितले.  यावेळी मोदींनी भाषणात मोदी यांनी नाव न घेता एका देशाच्या पंतप्रधानांचा उल्लेख केला. सार्वजनिक ठिकाणी त्या पंतप्रधानांनी मास्क न घालता गेल्याने १३ हजार रुपये इतक्या रकमेचा दंड ठोठवण्यात आला, असा सांगितले.

दरम्यान, मोदींनी ज्या पंतप्रधानांनी मास्क न घातल्यामुळे दंड ठोठावला. ते नेमके कोणत्या देशाचे देशाचे आहेत, याची उत्सुकता अनेकांना लागून राहिली आहे, तर ते आहेत बल्गेरियन पंतप्रधान बॉयको बोरिस्कोव्ह. एका चर्चला दिलेल्या भेटीवेळी बॉयस्को बोरिस्कोव्ह यांनी मास्क घातला नव्हता. आपल्याच सरकारच्या आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल त्यांना ३०० लेव्ह्ज (बल्गेरियन चलन) म्हणजे अंदाजे १३ हजार रुपये इतका दंड आकारण्यात आला. बुल्गारियामध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत आरोग्य विभागाने नियम कडक केले आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे अनिवार्य आहे.

Related posts

राज्यातील जनतेच्या मदतीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची राज्यस्तरीय २४x७ हेल्पलाईन

rasika shinde

राम विलास पासवान यांचे निधन म्हणजे माझे वैयक्तिक नुकसान – पंतप्रधान

News Desk

जितेंद्र आव्हाड यांनी रेमेडीसिविर बाबतीत केली ही विनंती

News Desk