नवी दिल्ली | “मी तुम्हा सर्वांना वचन ते की, २०१९मध्ये काँग्रेसची सरकार आल्यानंतर आम्ही तिहेरी तलाक कायदा रद्द करणार आहोत,” अशी घोषणा काँग्रेस महिला अध्यक्ष सुष्मिता देव यांनी म्हटले आहे. दिल्ली येथे आज (७ फेब्रुवारी) आयोजित केलेल्या अल्पसंख्यांक अधिवेशनात सुष्मिता बोलताना म्हणाल्या आहेत. या कार्यक्रमात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदींवर टीकास्त्र सोडले.
Sushmita Dev, Congress at at AICC minority department national convention in Delhi: Main aap logon se vaada karti hoon, ki Congress ki sarkar ayegi 2019 mein aur hum iss Triple Talaq kanoon ko khaarij karenge. Yeh aap logon se vaada hai. pic.twitter.com/jkskEGXAiD
— ANI (@ANI) February 7, 2019
तसेच पुढे सुष्मिता यांनी म्हटले की, तिहेरी तलाक कायदा करण्यामागे मुस्लीम पुरुषांना जेलमध्ये पाठवण्याचे हे षडयंत्र असल्याचा आरोपही त्यांनी भाजप सरकारवर केला आहे. “आपण मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाच्या महिला शाखेला भेटून तिहेरी तलाक कायद्याला विरोध केल्याप्रकरणी त्यांचे मानले.”
Congress President Rahul Gandhi at AICC minority department national convention: Hindustan ka pradhanmantri sirf jodne ki baat kar sakta hai, todne ki nahi, todne ki kari toh usko hata diya jayega. 2019 mein Narendra Modi, BJP,aur RSS ko Congress harane ja rahi hai pic.twitter.com/hfvP7z0fgL
— ANI (@ANI) February 7, 2019
देशाच्या पंतप्रधानांनी जोडण्याची भाषा करायला हवी. जो देशाला तोडण्याची भाषा करेल, त्याला पंतप्रधान पदावरुन हटवण्यात येईल, अशी टीका राहुल यांनी केली. २०१९ मध्ये काँग्रेस नरेंद्र मोदी, भाजप आणि आरएसएसला हरविणार आहे, असे बोलून राहुल यांनी आरएसएसवर निशाणा साधला. यावेळी राहुल यांनी ‘चौकीदार चोर है’ अशा घोषणा देखील दिल्या आहे. देशातील चौकीदार आज माझ्यावर रागावतात. तुम्ही आमची बदनामी करता, अशी मोदी तक्रार असते. मात्र मला देशातील चौकीदारांचा अपमान करायचा नाही. मी फक्त एकाच चौकीदाराबद्दल बोलतो, ज्याने चोरी केली आहे, असा टोला राहुल यांनी मोदींना लगावला.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.