मुंबई। देशातील २१ दिवसांचा लॉकडाऊन आता ३ मेपर्यंत वाढविण्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (१४ एप्रिल) दिली. यानंतर देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान आणि रेल्वे सेवा बंद करण्यात आली आहे.
All passenger train services on Indian Railways including Premium trains, Mail/Express trains, Passenger trains, Suburban Trains, Kolkata Metro Rail, Konkan Railway etc shall continue to remain cancel till the 2400hrs of 3rd May 2020. #IndiaFightsCorona
— Ministry of Railways (@RailMinIndia) April 14, 2020
‘भारतीय रेल्वेवरील सर्व प्रीमियम गाड्या, मेल/एक्स्प्रेस गाड्या, पॅसेंजर गाड्या, उपनगरी गाड्या, कोलकाता मेट्रो रेल्वे, कोकण रेल्वे इत्यादींसह सर्व प्रवासी रेल्वेसेवा ३ मे रोजी रात्री १२ वाजेपर्यंत रद्द राहतील.’ असे ट्वीट रेल्वे मंत्रालयाने केले आहे.
All domestic and international scheduled airlines operations shall remain suspended till11:59pm of 03 May 2020.
— DGCA (@DGCAIndia) April 14, 2020
देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय सर्व नियोजित विमानसेवा ३ मे रोजी रात्री ११: ५९ पर्यंत रद्द करण्यात आल्याचे ‘डीजीसीए’ने जाहीर केले.य, ही माहिती त्यांनी ट्विट करून दिली आहे.
आज देशातील करोनाबाधितांची संख्या १०३६३ वर पोहचली आहे. यामध्ये ७६ परदेशी नागरिकांचा समावेश आहे. यातील सध्या ८९८८ रुग्णांवर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. करोनामुळे ३३९ जणांनी आपले प्राण गमावले आहेत तर १०३६ जणांवर उपचार यशस्वी ठरलेत, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.