HW Marathi
देश / विदेश

अफजल गुरूच्या मुलाने केंद्रांकडे केली पासपोर्टची मागणी

नवी दिल्ली | “माझ्याजवळ आधारकार्ड आहे. मात्र, आता मला पासपोर्टची आवश्यकता आहे. मला तुर्कीमधून स्कॉलरशिप मिळत आहे. पासपोर्ट मिळाल्यानंतर मला परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेण्यास मदत होईल”, असे संसदेवर झालेल्या हल्ल्याचा मास्टर माईंड अफजल गुरूचा मुलगा गालिब गुरुने म्हटले आहे. गालिब गुरुने केंद्र सरकारकडे आपल्याला पासपोर्ट मिळावा, अशी मागणी केली आहे. गालिब गुरु याला परदेशात जाऊन वैद्यकीय शिक्षण घ्यायचे असल्याने त्याने केंद्राकडे आपल्याला पासपोर्ट मिळावा यासाठी मागणी केली आहे.

“मी ज्यावेळी तिहार कारागृहात वडिलांना भेटलो त्यावेळी त्यांनी मला डॉक्टर होण्यास सांगितले होते. मला माझ्या वडिलांची इच्छा पूर्ण करायची आहे”, असे गालिब गुरुने म्हटले होते. गालिब गुरूला बारावीत ८८ टक्के मिळाले असून त्याला कार्डियोलॉजिस्ट होण्याची इच्छा आहे.

Related posts

भारत-चीन युद्ध पेटविण्याचा अमेरिकेचा प्रयत्न-चीन

News Desk

जेएनयूतील विद्यार्थी संघाच्या निवडणुकीत ‘लेफ्ट अलायन्स’चा विजय

Gauri Tilekar

नववारी साडी नेसून पार केली 42 किलोमीटरची स्पर्धा

News Desk