HW News Marathi
देश / विदेश

एअरटेल-व्होडाफोनने ८२७ पॉर्नसाईट्स केल्या बॅन

नवी दिल्ली | रिलायन्स जिओने गेल्या आठवड्यात पॉर्न वेबसाइट ब्लॉक केल्या आहेत. त्यांनतर आता एअरटेल आणि व्होडाफोनसह ब्रॉडबँड सर्व्हिस देणा-या वेबसाइट्सनी पॉर्न साइट ब्लॉक केल्या आहेत. गेल्या आठवड्यात टेलिकॉम डिपार्टमेंटने इंटरनेट सर्व्हिस पुरवणा-या कंपन्यांना पॉर्न वेबसाइट ब्लॉक करण्याचे निर्देश दिले होते. टेलिकॉम इंडस्ट्रीतल्या आघाडीच्या कंपन्या एअरटेल आणि व्होडाफोनने ८२७ पोर्नोग्राफिक्स वेबसाइट्स बॅन केल्या आहेत.

उत्तराखंड उच्च न्यायालयाने २८ सप्टेंबर रोजी टेलिकॉम ऑपरेटर कंपन्यांना पॉर्न साइट ब्लॉक करण्याची सूचना दिली होती. त्यानंतर मुकेश अंबानींच्या जिओ नेटवर्कने जवळपास ८०० पॉर्नसाइट बॅन केल्या आहेत. न्यायालयाने इंटरनेट सर्व्हिस पुरवणा-या कंपन्यांना असा इशारा दिला होता कि”जर तुम्ही पॉर्न साइट दाखवण्यावर बंदी घातली नाही, तर तुमचे परवाने रद्द करू”. जिओने पॉर्न वेबसाइट ब्लॉक केल्यानंतर ‘पॉर्नहब’ या वेबसाईटने स्वतःचा डोमेन बदलून डॉट नेट केला आहे.

पॉर्न वेबसाइट असलेल्या ‘पॉर्नहब’नेही ट्विट केले आहे. भारतात आमच्या वेबसाइटवर बॅन लावल्यानंतर आम्ही ग्राहकांसाठी वेबसाइटच्या डोमेनमध्ये बदल केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोनामूळे ऑलिम्पिक स्पर्धेबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय

swarit

अखिलेश, लालूप्रसादसह चिराग पासवान यांची सुरक्षा काढली

News Desk

धनुष्यबाण आणि शिवसेना पक्ष कुणाचा?, निवडणूक आयोगासमोर आज होणार सुनावणी

Aprna